मुंबई : अभिनेत्री रिहा पिल्लई हिने आधीचा पती व टेनिसपटू लियांडर पेसवर केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आरोपांतर्गत दंडाधिकारी न्यायालयाने पेस याला दोषी ठरवले. पेस याने विविध प्रकारे आपल्यावर घरगुती हिंसाचार केला, असे आरोप पिल्लई हिने केला होता.
रिहा हिने २०१४ मध्ये पेसविरोधात तक्रार केली. आठ वर्षे ती पेसबरोबर लिव्ह-इनमध्ये राहत होती. ‘पेसच्या वर्तनामुळे माझ्यावर मानसिक आघात झाला, असे रिहा पिल्लई यांनी तक्रारीत म्हटले. प्रतिवाद्याने अनेकवेळा घरगुती हिंसाचार केला आहे, असे म्हणत न्यायालयाने पेस याला रिहा पिल्लई हिला दरमहिना एक लाख रुपये देखभाल खर्च आणि ५० हजार रुपये घरभाडे देण्याचे आदेश दिला.
मात्र, जर रिहा व पेस यांचे भागीदारीत असलेल्या वांद्रे येथील घरात राहू इच्छित असेल तर तिला हा लाभ मिळणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पेसची टेनिसमधील कारकीर्द संपली आहे. त्यामुळे पिल्लईला भाड्याच्या घरात राहा व पिल्लईला देखभालीचा खर्चही दे, असे निर्देश देणे योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटले.