चेन्नई : दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने रविवारी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे सांगताना नवनियुक्त नॉन प्लेर्इंग कॅप्टन महेश भूपतीच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम खेळ करण्यास सज्ज असल्याचे सांगितले. पेसला निवृत्तीच्या निर्णयाबाबत विचारले असता तो म्हणाला, तुम्हाला कळेलच. मी खेळाचा आनंद घेत आहे. मला हा खेळ आवडतो म्हणून मी खेळतो. एकवेळ अशी येईल की मला हा खेळ सोडावा लागेल. ती वेळ येण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो. हा प्रवास शानदार होता. तुम्ही सर्वांनी २० वर्षे माझी साथ दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो.’महेश भूपती आता भारतीय डेव्हिस कप संघाचा नॉन प्लेर्इंग कर्णधार झाला आहे. भूपती आणि पेस यांच्यातील संबंध सलोख्याचे नव्हते. याबाबत बोलताना पेस म्हणाला, ‘कर्णधार म्हणून आवश्यक असलेली योग्यता भूपतीकडे आहे. आगामी १८ महिन्यात काय घडते हे दिसेलच.’पेस पुढे म्हणाला, ‘ रमेश कृष्णन, एस.पी. मिश्रा, नरेश कुमार, आनंद अमृतराज, जयदीप मुखर्जी किंवा महेश यापैकी कुणीही कर्णधार असले तरी माझे काम केवळ देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे आहे.’ (वृत्तसंस्था)
लिएंडर पेसने दिले निवृत्तीचे संकेत
By admin | Published: January 02, 2017 12:42 AM