शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

लिएंडरला कृष्णन यांचा विक्रम मोडायचा आहे - डॉ. वेस पेस

By admin | Published: July 22, 2016 8:05 PM

लिएंडरने स्वत:चे काही लक्ष्य ठरवले आहेत. त्याला केवळ आॅलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक जिंकायचे नसून डेव्हीस चषक स्पर्धेतील रामनाथन कृष्णन यांचा सर्वाधिक एकेरी सामने

ऑनलाइन लोकमत

कोलकाता, दि.22 -  लिएंडरने स्वत:चे काही लक्ष्य ठरवले आहेत. त्याला केवळ आॅलिम्पिकमधील दुसरे वैयक्तिक जिंकायचे नसून डेव्हीस चषक स्पर्धेतील रामनाथन कृष्णन यांचा सर्वाधिक एकेरी सामने विजयाचा विक्रमही मोडायचा आहे, असे भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसचे वडिल डॉ. वेस पेस यांनी सांगितले.लिएंडर विक्रमी सातव्यांदा आॅलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज आहे. आपल्या मुलाविषयी बोलताना डॉ. पेस म्हणाले की, लिएंडरला दुसऱ्या वैयक्तिक आॅलिम्पिक पदक जिंकण्यासह दिग्गज रामनाथन कृष्णन यांचा सर्वाधिक डेव्हीस कप सामने जिंकण्याचा विक्रमही मोडायचा आहे.ह्णह्ण परंतु, सध्या लिएंडर एकेरी ऐवजी दुहेरी खेळत असल्याने याबाबत डॉ. पेस म्हणाले की, तो नक्कीच मोठ्या काळापासून एकेरी खेळला नाही, मात्र त्याने अनेक विक्रम नोंदवले आहेत. तो स्वत: स्वत:चे लक्ष्य ठरवतो. चंडिगड येथे झालेल्या डेव्हीस कप स्पर्धेत तो औचपारिक ठरलेल्या एकेरी सामन्यात खेळणार होता. परंतु, आॅलिम्पिकवर अधिक लक्ष केंद्रीत असल्याने त्याने आपला विचार बदलला. त्यामुळेच पुन्हा एकदा एकेरी खेळण्याची त्याला आशा आहे.वेळेनुसार लिएंडर परिपक्व होत गेला. तो सुरुवातीला खूप आक्रमक होता, पण आता तो शांत झाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तांत्रिकदृष्ट्या परिपक्व झाला आहे, असेही डॉ. पेस म्हणाले. दखल घेण्याची बाब म्हणजे गेल्या आॅलिम्पिकप्रमाणे यावेळेलाही पुरुष दुहेरी जोडीवरुन वाद निर्माण झाला होता. जागतिक क्रमवारीत १० वे स्थान पटकावून लिएंडरने आॅलिम्पिक तिकिट मिळवले होते. मात्र रोहन बोपन्नाने त्याच्यऐवजी युवा खेळाडू साकेत मायनेनी याला पसंती दिली होती. यानंतर अखिल भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) मध्यस्ती करताना बोपन्ना - पेस अशी जोडी निश्चित केली. 

लिएंडर गेल्या २३ वर्षांपासून खेळत असून क्रीडा राजकारण चांगल्या पध्दतीने ओळखून आहे. आता देशासाठी वैयक्तिक मतभेदांना विसरण्याची वेळ आली आहे. वैयक्तिक मतभेदांपेक्षा देशासाठी खेळणे अधिक महत्त्वाचे आहे. रोहन देखील व्यावसायिक खेळाडू असून एखाद्या विशेष शैलीसह कशाप्रकारे ताळमेळ साधावा हे तो जाणतो. दोघेही एकसाथ खेळणार याचा मला आनंद आहे. आपल्याकडे सर्वोत्तम पुरुष दुहेरी जोडी असून यांच्याकडून आपण पदकाची अपेक्षा करु शकतो.- डॉ. वेस पेस------------------------------- लिएंडर पेसने डेव्हीस कप स्पर्धेत ४८ एकेरी तर ४२ दुहेरी सामने जिंकले आहेत.- रामनाथान कृष्णन यांनी या स्पर्धेत ५० एकेरी आणि १९ दुहेरी सामने जिंकले आहेत.- लिएंडरला कृष्णन यांचा विक्रम मोडण्यासाठी २ एकेरी विजयांची आवश्यकता.- लिएंडर आॅलिम्पिक इतिहासातील एकमेव पदक विजेता भारतीय आहे.