एकाच चेंडूमध्ये लेग स्पिन आणि ऑफ स्पिन तुम्ही पाहिलाय का? म्हणजे एकदा चेंडू टाकला की तो पहिल्यांदा लेग स्पिन आणि त्यानंतर ऑफ स्पिन झालाय, असे तुम्ही कधीच पाहिले नसेल. पण ही गंमत क्रिकेटच्या मैदानातली नाही, असं सांगितलं तर तुम्ही चक्रावून जालं. कारण ही गोष्ट घडली आहे ती फुटबॉलच्या मैदानात. आता नेमकं काय झालं, याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल.
तर घडलं असं की, एक खेळाडू फुटबॉलचा सराव करत होता. प्रत्येक जण काही तरी हटके करायचा विचार करत असतो आणि त्यानुसार तो प्रयोग करत असतो. त्यानुसार या खेळाडूचा एक प्रयोग समोर आला आहे.
फुटबॉलमधील गोलपोस्टच्या डाव्या बाजूला तो काही अंतरावर उभा राहीला. तिथून त्याने चेंडूला किक मारली. हा चेंडू तिथून लेग स्पिनसारखा वळला. जेव्हा चेंडू गोलपोस्टच्या समोर आला तेव्हा चेंडू ऑफ स्पिन झाला आणि थेट गोलपोस्टमध्ये गेला.
हा व्हिडीओ आता चांगलाच वायरल झाला आहे. त्यामुळे या व्हिडीओमधील गोल खरा आहे की काही तंत्रज्ञान वापरून बनवला गेला आहे, याबाबत जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमके काय वाटते, तेदेखील आम्हाला सांगा.