मुंबई : फॉर्म्युला वन विश्वविजेत्या लुईस हॅमिल्टनने भारताला गरीब देश असे संबोधून रोष ओढावून घेतला आहे. एका मुलाखतीत त्याने भारतासारख्या गरीब देशात जाऊन चुक केल्याचे विधान केले होते. 2011-2013 या कालावधीत ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर फॉर्म्युला वन शर्यती झाल्या होत्या. त्यावेळी हॅमिल्टन भारतात आला होता.
तो म्हणाला,''व्हिएतनाम हे खूप सुंदर शहर आहे. पण, मी जेव्हा भारतात गेलो होतो, तेव्हा सर्व काही विचित्र वाटले होते. हा किती गरीब देश आहे. येथे सर्वकाही धक्कादायक आणि विचित्र आहे. तेथे जाऊन मी चुक केली.'' हॅमिल्टनच्या या विधानावर नेटीझन्स चांगलेच भडकले आणि त्याने टीकांचा पाऊस पाडला.