बॉलीवूड अभिनेत्री तारा शर्मा हिने स्टार्ट लाइनजवळ धावपटूंच्या सोबतीने बॉलीवूड अभिनेता राहुल बोससह सेल्फी घेतला. या वेळी अनेक बॉलीवूड स्टार्सनी उपस्थिती दर्शविताना मुंबईकरांचा उत्साह वाढविला.>स्पर्धेत सामील करागेल्या तीन वर्षांपासून मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेत आहे. या वेळी मी ट्रॅव्हलिंग स्पॉन्सरचे प्रतिनिधित्व केले. चॅम्पियनशिप डिसॅब्लेटीमध्ये खेळलो. दिव्यांगांची मॅरेथॉन ही १.५ किलोमीटरपर्यंत असते, परंतु ही फन मॅरेथान असते. त्यामुळे आमचे असे म्हणणे आहे की, दिव्यांग हे आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. तर त्यांच्यासाठी ही एक मॅरेथॉनची रेस असावी. चेन्नई आणि गोवा या ठिकाणी दिव्यांगांसाठी मॅरेथॉनची रेस घेऊन त्यात पहिले तीन विजेते निवडले जातात. इतर प्रकारांत दिव्यांग व्यक्तींना घेतले जात नाही. याबाबत आवाज उठविण्यात आला असून, अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दिव्यांगांच्या खेळासाठी राज्यात हवे तसे वातावरण होणे गरजेचे आहे.- राहुल रामुगडे, दिव्यांग स्पर्धक>देशातील मोठी मानली जाणारी मॅरेथॉनमी कोल्हापूरवरून मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी आलो आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे. मात्र, मुंबईची मॅरेथॉन देशामध्ये मोठी मानली जाते. या वर्षी मित्राच्या मदतीने मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. मॅरेथॉनमध्ये दीड किलोमीटर अंतर पार केले आहे. ही रेसिंग नसून फन रेस होती. चांगले मित्र मिळाले, नवीन काही तरी शिकायला मिळाले. चेन्नईमध्ये गेल्या वर्षी झालेली २१ किलोमीटरची व्हीलचेअर मॅरेथॉन २ तास १३ मिनिटांमध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. कोल्हापूर ‘लोकमत’ मॅरेथॉन, पुणे, बेळगाव अशा आठ-नऊ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे.- संतोष रांजगणे, दिव्यांग स्पर्धकदरवर्षी मॅरेथॉनमध्येसहभाग घेणारमुंबई मॅरेथॉनमध्ये यंदा पहिल्यांदा धावलो. स्पर्धेत धावून खूप मस्त वाटले. यापुढे दरवर्षी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. मॅरेथॉनमध्ये १० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले. मी एक खेळाडू असल्यामुळे धावण्याची जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.- किरण भोईर, स्पर्धक>मुंबई हमको हौसला देती हैं...आम्ही एकूण १७ जण मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आलो आहोत. सर्वजण लष्करातील अधिकारी असून, सीमेवर लढताना कोणी हात व पाय गमावलेला आहे. आमच्यासारखे लोक खूप आहेत, पण आर्थिक अडचण असल्यामुळे येथे येणे शक्य होत नाही. आम्ही सर्वजण देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धेत भाग घेण्यासाठी आलो आहोत. कारण ‘मुंबई हमको हौसला देती हैं’. मुंबईतील नागरिक खूप चांगले आणि सहकार्य करणारे आहेत. त्यामुळे आम्हाला हुरूप येतो. मी इतर राज्यांमध्येही धावलो आहे, परंतु मुंबई मॅरेथॉनमध्ये धावण्याची मजा औरच! त्यामुळे आमचा गु्रप दरवर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो. यंदाचे आमच्या ग्रुपचे आठवे वर्ष आहे.- मेजर जनरल कारडोजो, स्पर्धक
सेलिब्रिटींसह मागण्यांसाठी दिव्यांग धावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:04 AM