शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा

By admin | Published: June 27, 2016 10:21 AM

आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेला अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

कॅलिफोर्निया, दि. २७ - कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेला अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 
 
त्याने तडकाफडकी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सोमवारी चिली विरुद्धच्या कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा ४-२ ने पराभव झाला. पेनल्टी शूटआऊटमध्ये रंगलेल्या या सामन्यात मेस्सीने आपली पहिलीच पेनल्टी मिस केली.
 
न्यूजर्सी येथे झालेल्या अंतिम सामन्यानंतर दोन तासांच्या आतच मेस्सीने निवृत्तीची घोषणा केली. सलग दुस-यांदा कोपा अमेरिकेच्या अंतिम फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा चिलीकडून पराभव झाला. राष्ट्रीय संघाबरोबरचा माझा प्रवास संपला. हा माझा निर्णय आहे असे निराश झालेल्या मेस्सीने सांगितले. 
 
आणखी वाचा
कोपा अमेरिका - रोमहर्षक अंतिम फेरीत चिलीचा अर्जेंटिनावर ४-२ ने विजय
 
अंतिम सामन्यात मेस्सीला चिलीने जखडून ठेवले. त्याला मुक्तपणे खेळण्यास अजिबात वाव दिला नाही. पण पेनल्टी शूटआऊटमध्ये मेस्सीला ती संधी होती. मात्र त्याला या संधीचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. सामन्यानंतर मेस्सीचा हताश झालेला चेहराच सर्वकाही सांगून जात होता. अर्जेंटिनाकडून खेळताना मेस्सीने पहिल्यांदाज पेनल्टी शूट आऊटमध्ये गोल चुकवला. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी मेस्सीने जगभरातील कोटयावधी चाहत्यांना निवृत्तीचा चटका देणारा निर्णय घेतला आहे.
 
आणखी वाचा 
...तर मेसीला २२ महिने तुरुंगवासाची शिक्षा
 
२००५ मध्ये त्याने अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. बार्सिलोना क्लबकडून खेळणा-या मेस्सीला आपल्या देशाला कुठल्याही महत्वाच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवून देता आले नाही. अर्जेंटिनाकडून सर्वाधिक ५५ गोल त्याने केले. कोपा अमेरिका अंतिम सामना त्याचा ११३ वा आंतरराष्ट्रीय सामना होता.