शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

LIVE: धवन, कोहलीची अर्धशतके! भारत विजयासमिप

By admin | Published: June 11, 2017 3:29 PM

विराट कोहलीची टीम इंडिया आणि एबी डिव्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज करो या मरो सामन्यासाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत.

ऑनलाइन लोकमत

लंडन, दि. 11 - विराट कोहलीची टीम इंडिया आणि एबी डिव्हिलियर्सची दक्षिण आफ्रिका लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज करो या मरो सामन्यासाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर राहित शर्माला अवघ्या 12 धावांवर मॉर्केलने यष्टीरक्षक डी-कॉककरवी झेलबाद केलं. मात्र शिखर धवन आणि विराट कोहली यांनी दमदार अर्धशतके फटकावत भारताला विजयासमिप पोहोचवले आहे. 

यापुर्वी, चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या या निर्णायक लढतीत भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणा-या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे आज हाराकिरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 50 षटकही पूर्ण खेळता आली नाहीत. 44.3 षटकात आफ्रिकेचा अख्खा संघ केवळ 191 धावांत गारद झाला. भारताकडून बुमराह आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर अश्विन, पांड्या आणि जडेजा यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं. आफ्रिकेचे तीन फलंदाज धावबाद झाले. 

भारतीय गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-यामुळे सलामीवीर हाशिम अमला आणि डि-कॉक यांनी सावध सुरूवात केली होती. मात्र, 18 व्या षटकात अश्विनने अमलाला 35 धावांवर धोनीकरवी झेलबाद केलं. तर चांगली फलंदाजी करणा-या डी-कॉकला अर्धशतकानंतर रविंद्र जडेजाने त्रिफळाचीत केलं. डी-कॉकने 53 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या डिव्हिलिअर्स आणि डुप्लेसिस ही जोडी जमत आहे असं वाटत असतानाच डिव्हिलिअर्स 16 धावांवर धावबाद झाला तर त्याच्यानंतर आलेला मिलर हा देखील केवळ 1 धाव काढून धावबाद झाला. त्यानंतर मैदानावर जम बसलेला डु-प्लेसिस मोठी खेळी करेल असं वाटत असतानाच 36 धावांवर हार्दिक पंड्याने त्याला क्लीन बोल्ड केलं. दोन फलंदाज एकामागोमाग धावबाद आणि नंतर जम बसलेला डु-प्लेसिस बाद झाल्याने आफ्रिकेचा संघ अडचणीत आला. त्यांच्यानंतर एकाही खेळाडूला मैदानात तग धरता आला नाही. ख्रिस मॉरीस, फेलुक्व्वायो, रबाडा आणि मॉर्ने मॉर्केल यांनी केवळ हजेरी लावण्याचेच काम केले.  

श्रीलंकेविरोधात अनपेक्षितपणे पराभव स्वीकारावा लागल्यानंतर विराट कोहलीने आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यासाठी उमेश यादवच्या जागी आर.अश्विनला संधी दिली आहे.  श्रीलंकेविरोधात सुमार कामगिरी केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कसलेल्या फलंदाजांसमोर सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांमधला हा सामना म्हणजे एकप्रकारे उपांत्यपूर्व फेरीचा सामना आहे.  जो जिंकला त्याला उपांत्य फेरीचं तिकीट, पण जो हरला त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफीतलं आव्हानच संपुष्टात येणार आहे.

कोहलीच्या नेतृत्वाचा कस - 
गत चॅम्पियन भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ अशा उपांत्यपूर्व सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान आहे. विराट कोहलीच्या वन डे नेतृत्वाचा या सामन्यात कस लागणार आहे.
 
लंकेकडून पराभव होताच भारतीय तंबूत निराशा पसरली. अशावेळी दडपणात गुडघे टेकणाऱ्या द. आफ्रिकेला कोंडीत पकडून पराभूत करण्याचे डावपेच कोहलीला आखावे लागणार आहेत. भारत पराभूत झाल्यास स्पर्धेबाहेर पडेल. द. आफ्रिका हरल्यास जगातील नंबर वन संघ उपांत्य सामन्यापासून वंचित राहील.
 
मैदानाबाहेर वादविवाद सुरू असताना मैदानावर आज कोहलीसाठी एकही चूक महागडी ठरू शकेल. दुसरीकडे कसोटीपासून दूर असलेल्या एबी डिव्हिलियर्सला वन डेत अद्याप दमदार कामगिरी कायम असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.द. आफ्रिकेकडे क्वींटन डिकॉक, जेपी ड्यूमिनी, डेव्हिड मिलर असे तीन डावखुरे फलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय संघात अश्विनला स्थान मिळण्याची दट शक्यता असेल.
 
रवींद्र जडेजा मागच्या सामन्यात सपशेल अपयशी ठरल्यामुळे त्याचे स्थान अश्विन घेऊ शकतो. अश्विन दोन सामने बाहेर राहिल्यानंतर कामगिरी करण्यास उत्सुक असेल. जडेजा ३० यार्डच्या आत तरबेज क्षेत्ररक्षक तर आहेच शिवाय सीमारेषेवरून अलगद थ्रो देखील करतो. प्रत्येक सामन्यात तो किमान १०-१५ धावा वाचवितो. हार्दिक पांड्याला देखील बाहेर केले जाणार नाही. सातव्या स्थानावर आक्रमक खेळणारा त्याच्यासारखा फलंदाज नाही. जसप्रीत बुमराह डेथ डोव्हरमध्ये चांगले यॉर्कर टाकतो. याचा अर्थ असा की अश्विनला उमेश यादव किंवा भुवनेश्वरऐवजी स्थान द्यावे लागेल. लंकेविरुद्ध दुसऱ्या पॉवरप्लेदरम्यान भारताने २०० वर धावा मोजल्या. त्यामुळे देखील धावगतीला लगाम लावण्यासाठी अश्विनला खेळविणे क्रमप्राप्त झाले आहे. भारताच्या आघाडीच्या फळीने चांगली फलंदाजी केली. रोहित शर्मा, शिखर धवन ही जोडी फॉर्ममध्ये आहे.