गुवाहटी : भारत्तोलनात पहिल्याच दिवशी आपला दबदबा निर्माण करीत भारतीय वेटलिफ्टर्सनी दोन सुवर्णपदकांची कमाई केली. २0१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेची रौप्यपदक विजेती साइखोक मिराबाई चानू हिने भारताचे खाते उघडताना महिलांच्या ४८ किलो वजन गटात १६९ किलो स्नॅच आणि जर्कमध्ये ९0 किलोहून अधिक वजन उचलले. श्रीलंकेच्या दिनुषा हंसानी बोमिरीयागाने रौप्य, तर बांगलादेशच्या मोला शबिराने कांस्यपदक जिंकले.सॅगमध्ये पहिल्यांदाच महिला भारत्तोलनाचा समावेश करण्यात आला आहे. भारतासाठी दुसरे सुवर्णपदक गुरुराजा याने जिंकले. त्याने ५६ किलोगटात एकूण २४१ किलो (१0४ आणि १३७ किलोग्रॅम) वजन उचलले. या गटात रौप्यपदक श्रीलंकेच्या चतुरंगा लकमलने जिंकले. पाकिस्तानच्या अब्दुल्ला गफूरने कांस्यपदक आपल्या नावावर केले.
भारोत्तोलकांनी उचलला दोन सुवर्णपदकांचा भार
By admin | Published: February 07, 2016 3:19 AM