शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

लोढा समितीने बीसीसीआयला पाठविली प्रश्नावली

By admin | Published: May 19, 2015 1:33 AM

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना ८०पेक्षा अधिक प्रश्न विचारले

नवी दिल्ली : स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना ८०पेक्षा अधिक प्रश्न विचारले असून, त्यात बीसीसीआयमध्ये प्रशासकीय सुधारणा करण्याची जबाबदारीदेखील समितीकडे सोपविण्यात आली आहे.या समितीत लोढा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. अशोक भान आणि आर. व्ही. रवींद्रन यांचा समावेश आहे. समितीने बीसीसीआयकडे विविध मुद्द्यांवर विचारणा केली असून, त्यात पदाधिकाऱ्यांची दुटप्पी भूमिका, आॅडिट, बँक खाते, आर्थिक प्रकरणे आणि पारदर्शीपणा, यांसारखी प्रकरणे आहेत.दुटप्पी भूमिकेबाबत आयपीएल संघातील एखादा खेळाडू किंवा संघ अधिकारी फ्रेन्चायसीसोबत काम करीत असेल किंवा एखाद्या संघाचा मालक असेल तर बीसीसीआय त्यास दुटप्पी भूमिका मानते का, या स्थितीवर काय तोडगा काढण्यात आला, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.या प्रश्नाच्या उत्तरात कळविण्यात आले, की इंडिया सिमेंटचे मालक आणि सीएसकेचे सर्वेसर्वा एन. श्रीनिवासन यांच्या संदर्भात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतरच बीसीसीआयमध्ये अशीही मनमानी सुरू असल्याचे लोकांना कळले. याच प्रश्नांशी जुळलेल्या दोन उपप्रश्नांची उत्तरे एकाही पदाधिकाऱ्याला देता आलेली नाहीत. बीसीसीआय- आयपीएलशी संबंधित असलेले आणि व्यावसायिकहित जोपासणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी काही माहिती दडविली असेल तर त्यांना कुठल्या शिक्षेची तरतूद आहे, हा पहिला उपप्रश्न होता. आयपीएल व्यवसायात बोर्डाच्या प्रतिनिधींचे नातेवाईक आणि निकटचे लोक असू नयेत यासाठी काय उपाययोजना करण्यात आली होती, हा दुसरा उपप्रश्न विचारण्यात आला. (वृत्तसंस्था) बीसीसीआयकडे जी प्रश्नावली पाठविण्यात आली आहे, त्यात प्रश्नांची १ : संघटन, संरचना आणि संबंध, २ : कार्यालय समिती आणि निवडणूक, ३ : व्यावसायिक काम, करार आणि सेवा, ४ : आॅडिट, खाते आणि आर्थिक व्यवहार, ५ : खेळाडू कल्याण आणि विविध तोडगे, ६ : दुटप्पी भूमिका तसेच ७ निरीक्षण आणि पारदर्शीपणा, अशा सात विभागांत विभागणी करण्यात आली. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना ही प्रश्नावली मिळाली; पण एक अधिकारी ८२ पैकी केवळ ३५ प्रश्नांची उत्तरे देऊ शकला.