शहरं
Join us  
Trending Stories
1
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
2
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
3
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
4
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
5
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
6
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
7
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
8
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
9
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
11
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
12
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
13
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
15
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
16
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
17
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
18
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
19
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
20
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा

लोकपुरम संघाची दमदार आगेकूच!

By admin | Published: May 19, 2015 1:23 AM

लोकपुरम स्कूलने सिंघानिया चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीमध्ये बलाढ्य गुंडेचा स्कूलचा ७ विकेट्सने धुव्वा उडवून दमदार आगेकूच केली.

मुंबई : प्रतीक अपसिंघेच्या तडाखेबंद नाबाद ८९ धावांच्या जोरावर लोकपुरम स्कूलने सिंघानिया चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीमध्ये बलाढ्य गुंडेचा स्कूलचा ७ विकेट्सने धुव्वा उडवून दमदार आगेकूच केली. अन्य एका सामन्यात यजमान सिंघानिया स्कूलने सहज आगेकूच केली.सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलच्या वतीने सुरू असलेल्या या स्पर्धेत नाणेफेक जिंकून गुंडेचा संघाने प्रथम फलंदाजी करताना लोकपुरम समोर विजयसाठी ३० षटकांत १८९ धावांचे आव्हान उभे केले. सूर्यांश शेडगे (६०) आणि नाहूश पाटील (६४) यांनी आक्रमक फलंदाजी करताना संघाला आव्हानात्मक मजल मारून दिली. सोहम पिटकरने २८ धावांत २ बळी घेताना गुंडेचाला रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर धावांचा पाठलाग करताना लोकपुरम संघाने आक्रमक सुरुवात करताना गुंडेचा संघाची गोलंदाजी फोडून काढली. तत्पूर्वी झालेल्या अन्य एका सामन्यात यजमान सिंघानिया स्कूल संघाने सहज विजय मिळवताना सरस्वती स्कूल मराठी संघाचा ७ विकेट्सने फडशा पाडला. आर्यमन पवार (३/१६), कुनिक नायर (२) आणि सुजीत काणे (२) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर सिंघानिया संघाने सरस्वती संघाला ३० षटकांत ९ बाद १३७ असे रोखले. यानंतर विराज गोसावी (नाबाद ३७), प्रिथ्विक पंडित (नाबाद २९) आणि दिशान राणे (२८) यांच्या जोरावर सिंघानिया संघाने ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १८ षटकांतच विजय मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)प्रतीक अपसिंघे याने जबरदस्त पिटाई करताना लोकपुरमच्या विजयात मोलाचे योगदान दिले. ओमकार सावर्डेकरनेदेखील मोक्याच्या वेळी २५ धावा काढताना संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तोषीवालने २२ धावांत २ बळी घेत लोकपुरमला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला. लोकपुरमने प्रतीकच्या जोरावर २३.५ षटकांतच ३ बाद १९३ धावा फटकावल्या.