लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यमान परिस्थितीत स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवता यावे, या हेतूने लोकमत समूहातर्फे २ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत लोकमत व्हर्च्युअल फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले आहे.कोरोना विषाणूच्या महामारीमुळे रस्ते, ट्रॅक, शर्यती सर्वच काही थांबल्या आहेत. जीवनात एक अडथळा निर्माण झाला आहे. तथापि, या महामारीतही व्हर्च्युअल रन लोकप्रिय ठरत आहे.तंदुरुस्तीचे महत्त्व लक्षात घेऊनच लोकमत समूहातर्फे २ ऑगस्ट रोजी व्हर्च्युअल फ्रीडम रनचे आयोजन करण्यात आले आहे. या व्हर्च्युअल फ्रीडम रनचे आयोजन तुम्हाला प्रेरक आणि सक्रिय ठेवण्यास साह्यकारक ठरणार आहे.तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोठेही व रविवारी सकाळी ६ ते सायंकाळी ७ या वेळेत ३, ५ आणि १0 कि.मी. धावू शकता. तुम्ही रविवारी टेरेस किंवा परिसरात धावू शकता. विद्यमान परिस्थिती पाहता तंदुरुस्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्यासाठी धावा.जीवनातील अशा प्रतिकूल परिस्थितीत तंदुरुस्ती तसेच आत्मविश्वास आणि तीव्र इच्छाशक्तीद्वारे मात करता येते. अशा महामारीचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी तंदुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे स्वत:ला तंदुरुस्त ठेवणे महत्त्वाचे आहे.धावकाने खाली दिलेल्या लिंकवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. https://bit.ly/LMVirtualFreedomRum
२ ऑगस्टला लोकमत व्हर्च्युअल फ्रीडम रन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 4:30 AM