भारताच्या १७ वर्षीय शैली सिंगनं नैरोबी येथे सुरू असलेल्या २० वर्षीय जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. तिनं ६.५९ मीटर लांब उडी मारून दुसरे स्थान पटकावले, १ सेंटीमीटरच्या फरकानं तिला सुवर्णपदकानं हुलकावणी दिली. या स्पर्धेतील लांब उडी प्रकारातील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. यंदाच्या स्पर्धेतील भारताचे हे तिसरे पदक ठरले. याआधी अमित खत्रीनं १०००० मीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले, तर ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघानं कांस्यपदक जिंकले.
कोण आहे टीम डेव्हिड?; RCBचा नवा भीडू ICC ट्वेंटी-२० रँकिंगमध्ये वॉर्नर, रिषभ, स्मिथ यांच्याही पुढे!
शैली भारताची दिग्गज अॅथलेटिक अंजू बेबी जॉर्जच्या बंगळुरू येथील अकादमीत सराव करते. या स्पर्धेत एक वेळ अशी होती जेव्हा शैली सुवर्णपदकाच्या शर्यतीत सर्वांत पुढे होती. पण ज्युनियर युरोपियन चॅम्पियन असलेल्या माजाने चौथ्या प्रयत्नात ६.६० इतकी लांब उडी मारत सुवर्णपदक पटकावले. तिनं फायनलमध्ये तिसऱ्या प्रयत्नात ६.५९ मीटर उडी मारली. पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नात तिला ६.३४ मीटर लांब उडी मारता आली होती. चौथ्या व पाचव्या प्रयत्नात तिच्याकडून फाऊल झाला आणि सहाव्या प्रयत्नात तिनं ६.३७ मीटर लांब उडी मारली. स्वीडनच्या माजा अस्कागननं ६.६० मीटर लांब उडी मारून सुवर्णपदकावर कब्जा केला.