शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

नजर दुसऱ्या फळीतील खेळाडूंवर

By admin | Published: July 09, 2017 2:54 AM

आज विम्बल्डनमधला पहिला रविवार. स्पर्धेचा सुटीचा दिवस. विम्बल्डनच्या अनेक प्रथांपैकी ही एक प्रथा. ह्यामागे हिरवळीची डागडुजी करण्याचं कारण सांगितलं जातं.

आज विम्बल्डनमधला पहिला रविवार. स्पर्धेचा सुटीचा दिवस. विम्बल्डनच्या अनेक प्रथांपैकी ही एक प्रथा. ह्यामागे हिरवळीची डागडुजी करण्याचं कारण सांगितलं जातं. हार्ड कोर्टस् आणि मातीच्या कोर्टस्च्या तुलनेत गवताची अधिक निगा राखावी लागते हे बाकी खरंच आहे. खेळाडूंनाही एक दिवस महत्त्वपूर्ण विश्रांती मिळते, ही त्यात अजून एक जमेची बाजू.परवा आपण महिला गटातल्या विजेतेपदाच्या प्रमुख दावेदार बघितल्या. पुरुषांच्या विभागातले प्रमुख दावेदार आपण पुढल्या लेखात पाहूच, पण त्याआधी दोन्ही विभागातल्या विजेतेपदापासून फार जवळही नाहीत आणि फार लांबही नाहीत अशा दुसऱ्या फळीतल्या लोकांवर एक नजर टाकू. ह्यात तरुण तुर्कही आहेत आणि म्हातारे अनुभवी अर्कही.गार्बिन मुगुरुझा आणि येलेना ओस्टापेंको : फ्रान्सची २४ वर्षांची आक्रमक खेळ करणारी गुणी खेळाडू. गेल्या वर्षीची फ्रेंच ओपन विजेती. खेळाडूने आक्रमक खेळ खेळावा आणि प्रेक्षकांनी त्याचा मनमुराद आनंद घ्यावा. मात्र अशा खेळाचे जसे फायदे तसे काही तोटेही असतातच. परिणामी, मुगुरुझाचा खेळ आकर्षक आहे, पण सातत्याचा अभाव असलेला आहे. यंदाची फ्रेंच ओपन विजेती असलेल्या येलेनाची परिस्थितीही तशीच. तिचा खेळ तर अधिकच धारदार आहे. पटापट पॉर्इंट संपवायचा तिचा प्रयत्न असतो. जेव्हा ह्या दोन खेळाडू लयीत खेळत असतील तेव्हा त्यांना हरवणं मोठं अवघड काम असेल.

व्हीनस विल्यम्स : वय वर्षे जरी ३७ असले तरीही ती चांगली तंदुरुस्त आहे. अजूनही पहिल्या दहांत तिचा क्रमांक लागतो. विम्बल्डनवर तर तिचा खेळ नेहमीच बहारदार होतो. तब्बल ५ वेळा तिने इथे विजय मिळवलाय. यंदा मात्र तिला खेळासोबत स्वत:च्या मनाशीही लढत द्यायची आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या हातून एक अपघात झाला ज्यात एक व्यक्ती मरण पावली. पोलिसांनी कालच तिला निर्दोष घोषित केलंय, तरीही अनवधानाने का असेना, आपण एका मृत्यूस जबाबदार आहोत, ही जाणीवच कुणाही सामान्य माणसाला हादरवून टाकू शकते.

योहाना कोंटा : मूळची आॅस्ट्रेलियन पण सध्या ब्रिटिश नागरिक असलेली योहाना अचानकपणे विजेतेपदाच्या शर्यतीत आलेली आहे. इंग्लंडमध्ये सट्टेबाजी अधिकृतपणे चालवली जाते. सध्या तिथल्या सट्टेबाजांनी योहानाचं नाव पुढे केलेलं आहे. सहावं मानांकन असलेली योहाना मस्तच खेळत आहे. यजमान देशाच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेतच, पण तसाच पाठिंबाही आहे. योहाना नक्की कोणत्या बाजूकडे बघते ते महत्त्वाचं, कारण आतापर्यंत अनेक ब्रिटिश खेळाडू अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून गेले आहेत.

पुरुषांमधली दुसरी फळीपुरुषांच्या दुसऱ्या फळीत जी मुख्य नावं होती त्यातल्या दोघांचं आव्हान पहिल्या चार दिवसांतच आटोपलं. स्विस स्टॅन वावरिंका आणि जपानचा केई निशिकोरी. गेली काही वर्षे दोघेही सातत्याने उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेऱ्या गाठत आहेत. वावरिंका तर ३ ग्रँडस्लॅम स्पर्धाही जिंकलेला आहे. दोघांचाही खेळ मात्र गवतापेक्षा मातीवर आणि हार्ड कोर्टवर अधिक चांगला होतो. तरीही दोघांनी किमान चौथ्या फेरीपर्यंत मजल मारायला हवी होतीच.

मरिन चिलीच आणि मिलॉश रावनिचह्या दोघांचं साधर्म्य त्यांच्या अप्रतिम वेगवान सर्व्हिसमध्ये आहे. मिलॉश तर सध्या ‘बेस्ट सर्व्हर’ म्हणून गणला जातो. दोघांचाही सर्व्हिस सोडून इतर खेळही चांगला आहे. चिलीच माजी अमेरिकन ओपन विजेता आहे तर रावनिच गेल्या वर्षीच्या विम्बल्डन अंतिम फेरीत पोहोचला होता. यंदा उपांत्यपूर्व फेरीत दोन मातब्बर आणि ह्या वर्षीच्या दोन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या खेळाडूंशी ह्या दोघांची गाठ पडणार आहे. चिलीचसमोर नदालचं आव्हान असेल, तर मिलॉशपुढे रॉजर फेडररचं.

डॉमिनिक थिइम आणि साशा झेरेवभविष्यातले सुपरस्टार खेळाडू. अफाट गुणवत्ता, तरुण वय ह्या दोघांच्याही जमेच्या बाजू. आॅस्ट्रियाच्या थिइमचाही खेळ मातीवर जास्त बहरतो, पण सगळ्या प्रकारांत जिंकण्याची क्षमता त्यात नक्कीच आहे. थोडी योग्य दिशेने केलेली मेहनत त्याला फायदेशीर ठरेल. सध्या तो अनावश्यक स्पर्धा खेळतो आणि तंदुरुस्तीत मार खातो असं माझं वैयक्तिक मत आहे. जर्मनीच्या अलेक्झांडर म्हणजेच साशा झेरेवचा खेळ परिपूर्ण आहे. सर्व्हिस वेगवान आहे, जोरदार फोरहँडचं हत्यारही आहे. पुढल्या वर्षात ह्या दोघांपैकी एक जण ग्रँडस्लॅमविजेता झालेला बघायला नक्कीच आवडेल. झाडाला नवीन पालवी कधीतरी फुटणारच. फक्त कधी ते आता बघायचं.