शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

युवा भारतीय व अफगाणच्या खेळाडूंवर नजर

By admin | Published: February 20, 2017 12:46 AM

इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वासाठी आज (सोमवारी, दि. २०) होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावामध्ये भारतीय युवा खेळाडू व अफगाणच्या

बंगळुरू : इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वासाठी आज (सोमवारी, दि. २०) होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावामध्ये भारतीय युवा खेळाडू व अफगाणच्या खेळाडूंवर नजर राहणार आहे. लिलावामध्ये ३५० पेक्षा अधिक खेळाडूंचा समावेश असून, जास्तीत जास्त ७६ खेळाडूंना करारबद्ध करता येईल. दहा वर्षांच्या सायकलमध्ये ही अखेरची लिलाव प्रक्रिया असून, पुढील वर्षी स्पर्धेसाठी सर्व खेळाडू पुन्हा एकदा लिलाव पूलमध्ये सहभागी होतील. एका टीमला आपल्या खेळाडूंची संख्या जास्तीत जास्त २७ ठेवता येते. पण जास्तीत जास्त फ्रँचायसी खेळाडूंची संख्या २२ ते २४ ठेवण्यास पसंती देतात. खेळाडूंची मूळ किंमत १० लाख ते २ कोटी रुपयांदरम्यान आहे. त्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंवर मोठ्या रकमेची बोली लागण्याची शक्यता आहे. मूळ किंमत दोन कोटी रुपये असलेला कसोटी स्पेशालिस्ट ईशांत शर्मा फ्रँचायसींना आकर्षित करण्यात कितपत यशस्वी ठरतो, याबाबत उत्सुकता आहे. अधिक मूळ किंमत व टी-२० मध्ये अनुकूल गोलंदाजी करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे ईशांतवर बोली लावणे सोपे नसल्याचे भासत आहे. तो भारतीय संघाचा खेळाडू असून, ब्रँड म्हणून त्याचा वापर करण्यासाठी एखादा संघ त्याच्यावर गुंतवणूक करू शकतो. पण आयपीएल स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इरफान पठाणवर बोली लावण्यात येण्याची शक्यता अधिक आहे. त्याची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरॉनही संघांना आकर्षिक करू शकतो. त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये आहे. भारताचा नवोदित खेळाडू व झारखंडचा फलंदाज विराट सिंग व युवा खेळाडू पृथ्वी शॉ (दोघांची मूळ किंमत प्रत्येकी १० लाख रुपये) यांच्यावर लिलावामध्ये मोठ्या रकमेची बोली लागण्याची शक्यता आहे. तमिळनाडूचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन, दिल्लीचा कुलवंत खेजरोलिया व केरळचा वेगवान गोलंदाज बासिल थम्पी यांच्यावरही बोली लागण्याची शक्यता आहे. या तिघांची मूळ किंमत प्रत्येकी १० लाख रुपये आहे. खेजरोलिया व नटराजन यांनी अनेक फ्रँचायसी संघांसाठी चाचणी दिली आहे, तर थम्पी सातत्याने १४० किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. डेथ ओव्हर्ससाठी तो उपयुक्त गोलंदाज आहे. इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये अष्टपैलू बेन स्टोक्स, मर्यादित षटकांचा कर्णधार इयान मॉर्गन आणि आक्रमक फलंदाज जेसन रॉय यांचाही लिलावासाठी उपलब्ध खेळाडूंमध्ये समावेश आहे. मॉर्गन व स्टोक्स यांची मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे, तर जेसन रॉयची मूळ किंमत एक कोटी रुपये आहे. कुठलाही फ्रँचायसी संघ त्यांच्यावर बोली लावण्यापूर्वी विचार करेल. स्टोक्सबाबत विचार करता तो अष्टपैलू असल्यामुळे आठ-दहा सामन्यांत संघाच्या निकालामध्ये फरक स्पष्ट करण्यास सक्षम आहे. लिलावासाठी अफगाणिस्तानचे पाच खेळाडू उपलब्ध आहेत. पण त्यात मोहम्मद शहजाद (मूळ किंमत ५० लाख रुपये) आणि अष्टपैलू फिरकीपटू मोहम्मद नबी (मूळ किंमत ३० लाख रुपये) एखाद्या संघासोबत जुळण्याची शक्यता आहे. जर असे घडले तर अफगाण क्रिकेटसाठी ही नवी सुरुवात ठरणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा अपवाद वगळता जास्तीत जास्त फ्रँचायसींचा मुख्य संघ जवळजवळ निश्चित आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडे २३.३५ कोटी, तर डेअरडेव्हिल्सकडे २३.१० कोटी रुपये शिल्लक आहेत. या २ फ्रँचायसींदरम्यान एखाद्या खेळाडूला करारबद्ध करण्यासाठी चुरस अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्स (११.५५ कोटी रुपये) आणि आरसीबी (१२.८२ कोटी रुपये) यांच्याकडे सर्वात कमी रक्कम शिल्लक आहे. (वृत्तसंस्था)बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना सहभागी होण्यापासून रोखलेभारताचे माजी नियंत्रक आणि महालेखापरीक्षक विनोद राय यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकांच्या समितीने बीसीसीआयच्या तीन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आयपीएलच्या लिलावादरम्यान उपस्थित राहण्यास मनाई केली. सीओएने म्हटले, ‘सी. के. खन्ना, अमिताभ चौधरी, अनिरुद्ध चौधरी किंवा कुठली अन्य व्यक्ती जी बीसीसीआयचा पदाधिकारी असल्यामुळे आयपीएल संचालन परिषदेचा पदसिद्ध सदस्य असल्याचा दावा करीत असेल, तर त्याला आयपीएल खेळाडूंच्या लिलावामध्ये सहभागी होण्याचा अधिकार नाही. ’’खन्ना बीसीसीआयचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत, तर अनिरुद्ध कोषाध्यक्ष आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार करता अनिरुद्ध संयुक्त सचिव होते. पण सीओएच्या नियुक्तीनंतर या सर्वांचे अधिकार रद्द करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपात्र नसलेले आयपीएल संचालन परिषदेचे सदस्य लिलावादरम्यान उपस्थित राहू शकतात. सीओएने म्हटले आहे, की जर आयपीएल संचालन परिषदेमध्ये दोनपेक्षा अधिक पात्र अधिकारी नसतील तर २० फेब्रुवारी २०१७ ला होणाऱ्या आयपीएल खेळाडूंच्या लिलावासाठी विशिष्ट व्यक्तीकडे जबाबदारी सोपविता येईल. शेट्टी आयपीएल लिलावासाठी जाणार ; गांगुलीचा नकारनवी दिल्ली : बंगाल क्रिकेट संघटनेचे (कॅब) अध्यक्ष सौरभ गांगुली आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी तत्कालीन आयपीएल संचालन परिषदेच्या दोन सदस्य उद्या बंगळुरू येथे होणाऱ्या खेळाडूंच्या लिलाव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पात्र ठरले आहेत. विश्वसनीय सूत्रांनुसार बीसीसीआयने शेट्टी सहभागी होण्यास सांगितले आहे. परंतु, सौरभ गांगुलींने या लिलावा सोहळ््यासाठी जाणार नसल्याचे वृत्तसंस्थेला सांगितले.शेट्टी म्हणाले, ‘‘मी बंगळुरू येथे रवाना होत आहे. कारण सीईओ राहुल जौहरी यांनी मला माजी सदस्याच्या रूपात आयपीएल लिलावात सहभागी होण्यास सांगितले आहे.’’गांगुलीदेखील पात्र पदाधिकारी आहे; परंतु ते लिलावात सहभागी होणार अथवा नाही हे स्पष्ट झाले नाही.आयपीएलच्या आधीच्या संचालन परिषदेत राजीव शुक्ला, गांगुली, एम. पी. पांडोव, ज्योतिरादित्य सिंधिया आणि शेट्टी यांचा समावेश होता. न्यायालयाने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना याआधीच बीसीसीआयच्या बाहेर केले आहे.प्रशासक समितीच्या निर्देशानुसार उपाध्यक्ष सी. के. खन्ना, कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी आणि संयुक्त सचिव अमिताभ चौधरी सोहळ्यासाठी पात्र नाहीत. कारण त्यांचे शपथपत्र अद्यापही न्यायालयात प्रलंबित आहे.पांडोव यांनी पंजाब क्रिकेट संघटनेच्या पदाचा त्याग केला असल्यामुळे तेदेखील आयपीएल लिलावात सहभागी होण्यास पात्र नाहीत. आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला हे नऊ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेत होते, तसेच सिंधियादेखील मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेत ९ वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे तेदेखील आयपीएल लिलावात सहभागी होऊ शकणार नाहीत.