बेंगळुरु : चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शुक्रवारी दोन कॅरेबियन क्रिकेटपटूंचे वर्चस्व अनुभवायला मिळाले, पण अखेर किरोन पोलार्डच्या अर्धशतकी खेळीने सॅम्युअल बद्रीची हॅट््ट्रिक व्यर्थ ठरवली. पोलार्डच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचा ४ गडी राखून पराभव करीत इंडियन प्रीमिअर लीगच्या दहाव्या पर्वात तिसरा विजय नोंदवला. पोलार्डने ४७ चेंडूंना सामोरे जाताना ३ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ७० धावांची आक्रमक खेळी केली. मुंबई इंडियन्सने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना रॉयल चॅलेंजर्सने दिलेल्या १४२ धावांचे लक्ष्य १८.५ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. बद्रीच्या भेदक माऱ्यापुढे मुंबई इंडियन्सने ७ धावांत आघाडीचे चार फलंदाज गमावले होते. त्यानंतर पोलार्ड व कुणाल पांड्याच्या (३० चेंडू, नाबाद ३७ धावा, ३ चौकार, १ षटकार) साथीने ९.३ षटकांत सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करीत विजयाची मजबूत पायाभरणी केली. पोलार्ड बाद झाल्यानंतर पांड्या बंधूंनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. दहापेक्षा कमी धावसंख्या असताना चार बळी गमावल्यानंतर विजय मिळवणारा मुंबई इंडियन आयपीएलच्या इतिहासातील पहिला संघ ठरला. यंदाच्या मोसमात पहिला सामना खेळणाऱ्या बद्रीने चार षटकात १ निर्धाव षटक टाकताना ९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने वैयक्तिक दुसऱ्या व संघाच्या तिसऱ्या षटकात पार्थिव पटेल (३), मिशेल मॅक्लेनगन (०) आणि कर्णधार रोहित शर्मा (०) यांना बाद करीत हॅट््ट्रिक नोंदवली. आयपीएलमध्ये हॅट््ट्रिक घेणारा बद्री १२ वा गोलंदाज ठरला. आयपीएलमधील १५ वी तर यंदाच्या मोसमातील पहिली हॅट््ट्रिक ठरली. गेलला फलंदाजीमध्ये विशेष छाप सोडता आली नसली तरी त्याने दोन शानदार झेल टिपले, पण संघाचा सलग दुसरा पराभव टाळण्यात त्याला अपयश आले. त्याआधी, विराट कोहलीच्या (६२ धावा, ४७ चेंडू, ५ चौकार, २ षटकार) अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने ५ बाद १४२ धावांची मजल मारली. बेंगळुरू संघाला कोहलीच्या आक्रमक खेळीचा लाभ घेता आला नाही. अखेरच्या पाच षटकात त्यांना ४ गड्यांच्या मोबदल्यात केवळ ३१ धावा करता आल्या. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खांद्याला झालेल्या दुखापतीनंतर कोहली महिनाभर स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर होता. आज त्याने शानदार पुनरागमन केले. आरसीबीच्या डावात कोहली व्यतिरिक्त सलामीवीर ख्रिस गेल (२२ धावा, २७ चेंडू) व एबी डिव्हिलियर्स (१९ धावा, २१ चेंडू) यांचेही योगदान उल्लेखनीय ठरले. मुंबई इंडियन्सतर्फे मॅक्लेगन (२-२०), हार्दिक पांड्या (१-९) व कुणाल पांड्या (१-२१) यशस्वी गोलंदाज ठरले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलकरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु: २० षटकांत ५ बाद १४२ धावा(विराट कोहली ६२,ख्रिस गेल २२,डिव्हिलियर्स १९, पवन नेगी नाबाद १३, केदार जाधव ९,मॅक्लेनघन २/२०, हार्दिक पांड्या १/९, कुणाल पांड्या १/२१.)टर्निंग पॉइंट्सअनुभव हरभजन सिंग आणि इतर गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना पहिल्या ८ षटकात आरसीबीला ५३ धावांवर रोखले. बंगळुरुमध्ये पहिल्या डावातील ही सर्वात निचांक धावसंख्या ठरली.अखेरच्या ५ षटकात आरसीबीला एकही चौकार मारता आला नाही. त्यांनी केवळ ३२ धावा काढल्या.संयमी सुरुवात केल्यानंतर केरॉन पोलार्डने तुफानी फटकेबाजी करत निर्णायक तडाखा दिला. सॅम्युअल बद्रीने घेतलेल्या हॅट्ट्रीकमुळे मुंबईकरांनी सावध पवित्रा घेत स्थिरावण्यास वेळ दिला. मुंबई इंडियन्स : १८.५ षटकांत ६ बाद १४५ धावा (किरॉन पोलार्ड ७०,कुणाल पांड्या नाबाद ३७, नीतिश राणा ११, हार्दिक पांड्या नाबाद ९,सॅम्युअल बद्री ४/९,स्टुअर्ट बिन्नी१/१४, यजुवेंद्र चहल १/३१.)वर्षगोलंदाजबाद झालेले फलंदाज२००८लक्ष्मीपती बालाजी (चेन्नई)इरफान पठाण, पियुष चावला, व्हीआरव्ही सिंग (पंजाब)२००८अमित मिश्रा (दिल्ली)रवी तेजा, प्रग्यान ओझा, आरपी सिंग (डेक्कन)२००९युवराज सिंग (पंजाब)जॅक कॅलिस, मार्क बाऊचर, रॉबिन उथप्पा (बंगळुरु)२००९रोहित शर्मा (डेक्कन)अभिषेक नायर, हरभजन सिंग, जेपी ड्युमिनी (मुंबई)२००९युवराज सिंग (पंजाब)हर्षल गिब्स, अँड्रयू सायमंड्स, वेणुगोपाळ राव (डेक्कन)२०१०प्रवीण कुमार (बंगळुरु)डॅमियन मार्टिन, सुमित नरवाल, पारस डोग्रा (राजस्थान)२०१२अजित चंडेला (राजस्थान)जेसी रायडर्स, सौरभ गांगुली, रॉबिन उथप्पा (पुणे)२०१३सुनिल नरेन (कोलकाता)डेव्हिड हसी, अझर मेहमूद, गुरकीरत सिंग (पंजाब)२०१३अमित मिश्रा (हैदराबाद)भुवनेश्वर कुमार, राहुल शर्मा, अशोक दिंडा (पुणे)२०१४प्रविण तांबे (राजस्थान)मनिष पांड्ये, युसुफ पठाण, रायन डोइशेट (कोलकाता)
पोलार्डमुळे मुंबई ‘लॉर्ड’
By admin | Published: April 15, 2017 4:51 AM