शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
3
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
4
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
5
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
6
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
7
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
8
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
9
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
10
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
11
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
12
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
13
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
14
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
15
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
16
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
17
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
18
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
19
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
20
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा

संधी गमावल्यामुळे विजयाचे हकदार नव्हतो

By admin | Published: July 11, 2017 2:14 AM

वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० लढतीमध्ये रविवारी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे

किंग्जस्टन : वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० लढतीमध्ये रविवारी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या कामगिरीवर टीका केली आहे. आमच्या खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजीमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यामुळे आम्ही विजयाचे हकदार नव्हतो, असे कोहली म्हणाला.प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद १९० धावांची मजल मारली, पण एविन लुईसने ६२ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद १२५ धावांची खेळी करीत टी-२० विश्व चॅम्पियन वेस्ट इंडिज संघाला १८.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठून दिले. लुईसने शतकी खेळी १२ षटकार व ६ चौकारांनी सजवली. कोहली म्हणाला, ‘टी-२० क्रिकेटमध्ये अनेकदा वाईट दिवसाला सामोरे जावे लागते. विंडीजचा टी-२० संघ चांगला आहे. गेल्या काही वर्षांपासून हे खेळाडू खेळत आहेत. आमचा संघ सध्या संक्रमणाच्या स्थितीत आहे. त्यामुळे चढ-उतार अनुभवायला मिळत आहेत.’ दुसऱ्या बाजूचा विचार करता विंडीजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने विजयानंतर आनंद व्यक्त केला. ब्रेथवेट म्हणाला, ‘मी खूश आहे. आम्ही फलंदाजांना नैसर्गिक खेळ करण्याचा सल्ला दिला होता. जो खेळाडू अर्धशतक झळकावेल त्याला माझ्या मानधनातील अर्धी रक्कम देण्यात येईल, असे मी जाहीर केले होते. आम्ही आमच्या चाहत्यांना खूश करण्यास प्रयत्नशील होतो. आम्ही आयपीएल बघितले असून डेथ ओव्हर्समध्ये भुवनेश्वर कशी गोलंदाजी करतो, याची कल्पना होती.’(वृत्तसंस्था)>झेल सोडल्यामुळे पराभव : कार्तिकसुमार क्षेत्ररक्षणामुळे विंडीजविरुद्ध रविवारी टी-२० लढतीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. झेल सोडणे महागात पडले, अशी प्रतिक्रिया भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने व्यक्त केली. सहाव्या षटकात एविन लुईसचा भुवनेश्वरच्या गोलंदाजीवर उडालेला झेल कोहली व मोहम्मद शमी यांच्यादरम्यान ताळमेळ नसल्यामुळे सुटला. त्यानंतर चार चेंडूंनंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर त्याचा उडालेला झेल कार्तिकला टिपण्यात अपयश आले. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कार्तिक म्हणाला, ‘जर मिस हिटवरही चेंडू सीमारेषेबाहेर जात असेल तर हा फलंदाजाचा दिवस असल्याचे आपल्या लक्षात येते. लुईसने आम्हाला दोन संधी दिल्या, पण त्याही आम्हाला कॅश करता आल्या नाहीत. आम्ही अनेक झेल सोडले आणि त्यामुळे सामन्यावरील पकड निसटली.’भारतातर्फे २९ चेंडूंमध्ये ४८ धावांची खेळी करणारा कार्तिक म्हणाला,‘१९० ही वाईट धावसंख्या नव्हती, पण लुईसची फलंदाजी बघितल्यानंतर हे आव्हान खुजे ठरले. त्याने चौकारांच्या तुलनेत षटकार अधिक ठोकले.’दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला या लढतीत खेळता आले नाही. कार्तिकच्या मते त्याची संघाला उणीव भासली. पांड्या अष्टपैलू खेळाडू असून गोलंदाजी व फलंदाजीमध्ये त्याची आम्हाला उणीव जाणवली, असेही कार्तिक म्हणाला. (वृत्तसंस्था)ही चांगली लढत होती. भारतासारख्या संघाविरुद्ध शतक झळकावणे प्रतिष्ठेची बाब आहे. मला सलग पाच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण मी स्वत:वरील विश्वास ढळू दिला नाही आणि या लढतीत मला त्याचा लाभ झाला. - एविन लुईसआम्ही फलंदाजी करताना २५-३० जास्तीच्या धावा फटकावू शकलो असतो. आम्हाला २३० धावा फटकावण्याची संधी होती, पण आम्ही संधी गमावली आणि त्यामुळे आम्ही विजयाचे हकदार नव्हतो. एका फलंदाजाला डावामध्ये सूत्रधाराची भूमिका बजावणे आवश्यक होते. दिनेशने चांगला खेळ केला, पण कुणीतरी ८०-९० धावांची खेळी करणे अपेक्षित होते. त्यानंतर आमची गोलंदाजीही चांगली झाली नाही.- विराट कोहली, कर्णधार