जमीर काझी
मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेसह (एमसीए) देशातील विविध क्रिकेट संघटना व आयोजकांना आता पोलिसांच्या बंदोबस्तासाठी जादा शुल्क मोजावे लागणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकाराच्या सामन्यावेळी पुरविण्यात येणाऱ्या बंदोबस्तासाठी सरासरी चार ते दहा लाख रुपये दर वाढविण्यात आले आहेत. नवीन शुल्काची अंमलबजावणी एक एप्रिलपासून लागू करण्याचा निर्णय गृह विभागाने नुकताच घेतला आहे. यामुळे याचा ताण तिकिट शुल्कावरही पडू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरवर्षी साधारण मे, जून महिन्यामध्ये बंदोबस्ताच्या शुल्काची निश्चिती केली जाते. यावर्षी मात्र त्याबाबत निर्णय गृह विभागाला तब्बल आठ महिने घेतली आहेत. त्यामुळे या कालावधीत झालेल्या सामन्यांच्या बंदोबस्ताची शुल्क वसुली नव्याने करावी लागणार आहे. टी२०, एकदिवसीय व कसोटी सामन्यांनुसार त्यासाठीच्या बंदोबस्ताचे दर निश्चित करण्यात आले आहेत. आंतरराष्टÑीय क्रिकेट सामन्यांसाठी नेहमीच क्रिकेटप्रेमींची अलोट गर्दी होत असते. त्यामुळे संघ, खेळाडूंच्या सुरक्षिततेबरोबरच सामना सुरळीत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लागू करावा लागतो. त्यासाठी स्थानिक पोलीस व होमगार्ड तैनात केले जाते. त्याबद्दल्यात सामना आयोजकांना बंदोबस्ताचे शुल्क द्यावे लागते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई, नागपूर, पुणे व नवी मुंबई याठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने खेळविले जातात. त्याबाबत या महानगरानिहाय व सामन्याच्या प्रकारानुसार दरवर्षी गृह विभागाकडून बंदोबस्त शुल्कात वाढ होते. त्यानुसार मुंबई पोलीस व अन्य तीन आयुक्तालयाच्या प्रस्तावानुसार गृह विभागाने शुल्क निश्चित केले. यात मुंबईत होणाºया टी२०, एकदिवसीय व कसोटी सामन्यासाठी अनुक्रमे ७०, ७५ व ६० लाख रुपये आकारले जाणार आहेत, तर अन्य तीन ठिकाणी टी२० व एकदिवसीय सामन्यासाठी प्रत्येकी ५० तर कसोटी सामन्यासाठी ४० लाख रुपये शुल्क घेतले जातील. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीपर्यंत या दराप्रमाणे प्रत्येक सामन्यासाठी आयोजकांना पैसे मोजावे लागणार आहेत.अधिक बंदोबस्तासाठी २५ टक्के अतिरिक्त शुल्कया शिवाय जर एखाद्या सामन्याच्या वेळी घातपाताची धमकी आली असल्यास त्याठिकाणी निश्चित केलेल्या प्रमाणाशिवाय अधिक बंदोबस्त पुरवावा लागतो, त्यासाठी जास्तीजास्त २५ टक्के अधिक शुल्क आकारले जाणार आहे.च्सामना झाल्यानंतर आयोजकांनी त्यासंबंधीचे संबंधित शुल्क एक महिन्याच्या आत जमा करावयाचे आहे, त्याला विलंब झाल्यास त्या रक्कमेवर ९.५ टक्के व्याज आकारण्याची तरतूद आहे.बंदोबस्तासाठी आकारले जाणारे शुल्क (लाखांत)मुंबईतील सामनेप्रकार शुल्क गतवर्षीचेदरटी-२० ७० ६६वनडे ७५ ६६कसोटी ६० ५०नागपूर, पुणे व नवीमुंबईतील सामन्यासाठीप्रकार शुल्क गतवर्षीचेशुल्कटी-२० ५० ४५वनडे ५० ४५कसोटी ४० ३०