बर्गिंहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपली सोनेरी कामगिरी दाखवली आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण १४ पदके आली आहेत. १४ मधील ९ पदक वेटलिफ्टिंगमधून मिळाली आहेत. यामध्ये पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. बुधवारच्या दिवशी भारताकडून लवप्रीत सिंग सुवर्ण पदक जिंकण्याच्या शर्यतीत होता, मात्र १०९ किलो वजनी गटाच्या श्रेणीतील लवप्रीतला सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली आणि कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. लवप्रीत सिंगने स्नॅच राउंडमध्ये शानदार खेळ दाखवला आणि तिन्ही प्रयत्नात भार यशस्वीपणे उचलला. त्याने स्नॅच राउंडमध्ये अनुक्रमे १५७ किलो, १६१ किलो आणि १६३ किलो वजन उचलले. तब्बल ३५५ किलो भार उचलून लवप्रीत सिंगने कांस्य पदकावर नाव कोरले आहे.
स्नॅच राउंडपहिला प्रयत्न - १५७ किलो यशस्वी.दुसरा प्रयत्न - १६१ किलो यशस्वी.तिसरा प्रयत्न - १६३ किलो यशस्वी.
लवप्रीत सिंगने स्नॅच राउंडमध्ये देखील शानदार खेळ दाखवला आणि तिन्ही प्रयत्नाच यशस्वीपणे भार उचलला. त्याने स्नॅच राउंडमध्ये अनुक्रमे १८५ किलो, १८९ किलो आणि १९२ किलो वजन उचलले. या पद्धतीने लवप्रीतने एकूण ३५५ (१६३ + १९२) किलो भार उचलला आहे.
क्लिन ॲंड जर्क राउंडपहिला प्रयत्न - १८५ किलो यशस्वी. दुसरा प्रयत्न - १८९ किलो यशस्वी.तिसरा प्रयत्न - १९२ किलो यशस्वी.
कोण आहे लवप्रीत सिंग? २४ वर्षीय लवप्रीत सिंग भारताला कांस्य पदक जिंकून दिले आहे, तो १०९ किलो वजनी गटाच्या श्रेणीत आहे. त्याने त्याच्या श्रेणीमध्ये राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावले होते. याच विजयाने त्याला राष्ट्रकुल स्पर्धेचे तिकिट मिळवून दिले होते. पंजाबमधील अमृतसर येथील लवप्रीतने आशियाई ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकले होते, तसेच को राष्ट्रकुल ज्युनिअरचा चॅम्पियन देखील राहिला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत पदक विजेते भारतीय खेळाडू
- संकेत महादेव - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
- गुरूराजा पुजारी - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ६१ किलो)
- मीराबाई चानू - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ४९ किलो)
- बिंद्यारानी देवी - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
- जेरेमी लालरिनुंगा - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ६७ किलो)
- अचिंता शेऊली - सुवर्ण पदक (वेटलिफ्टिंग ७३ किलो)
- सुशीला देवी - रौप्य पदक (ज्युडो ४८ किलो)
- विजय कुमार यादव - कांस्य पदक (ज्युडो ६० किलो)
- हरजिंदर कौर - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ७१ किलो)
- महिला संघ - सुवर्ण पदक (लॉन बॉल्स)
- पुरूष संघ - सुवर्ण पदक (टेबल टेनिस)
- विकास ठाकूर - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ९६ किलो)
- मिश्र बॅडमिंटन संघ - रौप्य पदक
- लवप्रीत सिंग - कांस्य पदक (वेटलिफ्टिंग १०९ किलो)