पुणे : आयपीएलच्या माध्यमातून मला वीरेंद्र सेहवागसोबत खेळण्याची संधी मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. या लीगमुळेच सचिन तेंडुलकरसारख्या महान क्रिकेटरकडूनही मला शिकण्यास मिळाल्याची कृतज्ञता ग्लेन मॅक्सवेल याने व्यक्त केली. आयपीएलच्या गत मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून आपल्या फलंदाजीचा तडका दाखविणाऱ्या मॅक्सवेलने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या मोसमात गेल्या दोन सामन्यांत मॅक्सवेलची बॅट तितकीशी तळपलेली नाही. या विषयी बोलताना तो म्हणाला, चढ-उतार हा क्रिकेटचाच एक भाग आहे. मात्र मी नक्कीच पुनरागमन करेल या विषयी मला विश्वास आहे. आयपीएल विषयी बोलताना मॅक्सवेल म्हणाला, भारतीय खेळाडूंकडून खूप काही शिकण्यास मिळाले आहे. तेंडुलकर-सेहवाग या सारख्या खेळाडूंसमवेत खेळण्याची संधी मिळाली. नेटमध्ये सराव करताना सेहवाग समवेत क्रिकेटविषयी अनेकदा चर्चा होते. त्यावेळी त्याने मला आपला नैसर्गिक खेळ करण्यास सांगितले. तसेच आपल्या खेळावर कितीही टीका झाली तरी त्याकडे दुर्लक्षकरुन आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा बहुमोल सल्ला देखील त्याने दिला. (वृत्तसंस्था)
भाग्यशाली! सेहवागसोबत खेळण्यास मिळाले
By admin | Published: April 14, 2015 12:58 AM