शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

ल्यूज खेळाडू केशवनने घेतली निवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:05 AM

हिवाळी खेळांमध्ये ब-याच काळापासून भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू शिवा केशवन याने प्योंगचोंग हिवाळी आॅलिम्पिकनंतर पुरुष ल्यूज एकेरी स्पर्धेत ३४ व्या स्थानावर राहिल्यानंतर दोन दशकांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधून निवृत्ती घेतली आहे.

प्योंगचोंग : हिवाळी खेळांमध्ये ब-याच काळापासून भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू शिवा केशवन याने प्योंगचोंग हिवाळी आॅलिम्पिकनंतर पुरुष ल्यूज एकेरी स्पर्धेत ३४ व्या स्थानावर राहिल्यानंतर दोन दशकांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय करियरमधून निवृत्ती घेतली आहे.आपल्या सहाव्या आणि अखेरच्या हिवाळी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या ३६ वर्षांच्या केशवन याने आॅलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. आॅलिम्पिक स्लाईडिंग सेंटरमध्ये तिस-या राऊंडमध्ये हिटमध्ये १३४४ मीटरच्या ट्रॅकला ४८.९०० सेकंदांच्या वेळेत पूर्ण केले.तिसºया हिटमध्ये ४० प्रतिस्पर्धींमध्ये ३० व्यात तर तीन फेºयांनंतर ३४ व्या स्थानावर राहिला. तीन फे-यांत अव्वल २०मध्ये स्थान मिळवू न शकल्याने तो चौथ्या फेरीत सहभागी होऊ शकला नाही. तीन फे-यात त्याचा एकूण स्कोअर दोन मिनिट २८.१८८ सेंकद असा राहिला.केशवन याने तिसºया फेरीनंतर आपली स्लेड उचलून अभिवादन केले. त्या वेळी प्रेक्षकांमध्ये त्याचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते.हिमाचल प्रदेशातील मनालीजवळील वशिष्ठ येथे राहणारा केशवन हा भारताचा हिवाळी आॅलिम्पिकमधील चेहरा होता. त्याने २०११, २०१२, २०१६ अणि २०१७ मध्ये आशियाई ल्यूज चॅम्पियनशिप पटकावली होती. (वृत्तसंस्था)भूकंप व वादळाचे सावट-भूकंपाचा इशारा आणि वादळी हवामानामुळे हिवाळी आॅलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना अडचणींचा सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तेथील प्रशासन आणि आयोजन समितीच्या अधिकाºयांनी खेळाडू, संघव्यवस्थापक, विविध आंतरराष्टÑीय महासंघांच्या पदाधिकाºयांना गरम कपडे घालण्याचे आवाहन केले आहे.उद्घाटन समारंभादरम्यान प्रचंड थंडी आणि नंतर कोरियाच्या पूर्व भागात ४.६ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आयोजकांनी विश्वास दिला, की क्रीडा स्पर्धा ज्या ठिकाणी आयोजित केल्या आहेत तेथील जमीन ७ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्केसुद्धा सहन करू शकते.रविवारी स्की अधिका-यांना पुरुषांच्या डाऊन हिल स्पर्धा स्थगित कराव्या लागल्या. वादळी वातावरणामुळे महिलांच्या स्लोपस्टाइल स्नोबोर्डिंगच्या पात्रता फे-यासुद्धा रद्द करण्यात आल्या.