शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

लीन, नरेनची विक्रमी कामगिरी

By admin | Published: May 08, 2017 5:25 AM

आयपीएलच्या या सत्रात गौतम गंभीरने सुनील नरेनला गोलंदाजीसोबतच सलामीवीराची भूमिका दिली, आणि त्याने ती यशस्वीपणे निभावलीदेखील

आकाश नेवे/ आॅनलाईन लोकमतआयपीएलच्या या सत्रात गौतम गंभीरने सुनील नरेनला गोलंदाजीसोबतच सलामीवीराची भूमिका दिली, आणि त्याने ती यशस्वीपणे निभावलीदेखील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरोधात खेळताना नरेनने फक्त १५ चेंडूतच अर्धशतक झळकावले, तर त्याआधी गोलंदाजी करताना दोन गडीदेखील बाद केले. ख्रिस लीन यानेदेखील २२ चेंडूत ५० धावा कुटल्या. आयपीएलमधील एक यशस्वी कर्णधार म्हणून गौतम गंभीर ओळखला जातो. केकेआरला दोन विजेतेपद त्याच्या नेतृत्वात मिळाले आहेत. यंदा त्याने यशस्वीपणे पार्ट टाईम ओपनरचा प्रयोग केला, आणि आजच्या सामन्यात तर त्याने ख्रिस लीन, सुनील नरेन यांना सलामीला पाठवले. दरम्यान, त्यांच्या वादळात आरसीबीचे माफक आव्हान केव्हाच उडून गेले. लीन आणि नरेन यांनी पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक १०५ धावा काढण्याचा विक्रमही आपल्या नावे केला, याआधी हा विक्रम चेन्नई सुपर किंग्जच्या नावे होता.

सीएसकेने २०१४ मध्ये पंजाब विरोधात पॉवर प्लेमध्ये १०० धावा केल्या होत्या, पार्ट टाईम ओपनर असलेल्या लीन आणि नरेन यांनी या विक्रमालाही मागे टाकले. नरेन बाद झाल्यावरही गंभीरने कॉलीन ग्रॅण्ड डी होमला फलंदाजीसाठी पाठवून नवा प्रयोग करून पाहिला. त्यात तो या सामन्यात यशस्वी ठरला. बद्रीचे चौथे षटक नरेनसाठी फायद्याचे ठरले, त्याने सलग तीन षटकार ठोकले. नरेनने ५४ पैकी ४८ धावा चौकार आणि षटकारांच्या साहाय्याने वसूल केल्या. आरसीबीच्या दिग्गजांची हाराकिरी या सामन्यातही कायम राहिली. हिरवी जर्सी घालून मैदानात उतरलेल्या आरसीबीला १५८ धावा करता आल्या. मनदीप सिंहने अर्धशतक झळकावले, तर शेन वॉटसनच्या जागी संधी मिळालेल्या ट्रॅव्हिस हेड याने ७५ धावा झळकावल्या. मात्र इतर फलंदाजांना या सामन्यातही सूर न गवसल्याने संघाला मोठा फटका बसला. १५८ धावांचे माफक आव्हान केकेआरने १६व्या षटकातच पूर्ण केले. या आधीच स्पर्धेतून बाहेर पडलेल्या रॉयल चँलेंजर्सची स्पर्धेतून सन्मानाने निरोप घेण्याची आणखी संधी निसटली आहे. आरसीबीचा अखेरचा सामना १४ मे रोजी दिल्ली सोबत होणार आहे. ही स्पर्धा विराट कोहलीसाठी निराशाजनकच राहिली आहे. या सामन्यातील विजयाने केकेआर गुणतालिकेत पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. १२ सामन्यांत ८ विजयांसह केकेआरने दुसरे स्थान गाठले आहे.