ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या १९ व्या मानांकित मॅडिसन कीज हिने महिला टेनिसमधील नंबर वन आर्यना सबालेंका हिला पराभूत करत नवा इतिहास रचला आहे. ती ग्रँडस्लॅमची नवी सम्राज्ञी ठरलीये. अमेरिकन मॅडिसन हिने तीन सेटमध्ये सामना जिंकत तिने ऑस्ट्रेलियन ओपनसह आपल्या कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातलीये.
सबालेंकाची हॅटट्रिक हुकली
संबालेंका विरुद्धच्या फायनल लढतीत अमेरिकन महिला टेनिस स्टारनं पहिला सेट ६-३ असा जिंकत दमदार सुरुवात केली. त्यानंतर सबालेंकानं दमदार कमबॅक करत दुसरा सेट ६-२ असा जिंकत लढतीत बरोबरी साधली. पण तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये मॅडिसन सर्वोत्त खेळाचा नजराणा पेश करत सेट ७-५ असा आपल्या नावे करत सामना जिंकत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. दुसरीकडे सबालेंका हिला सलग तिसऱ्यांदा मेलबर्न पार्कवर जेतेपद मिळवण्याचे स्वप्न हवेत विरले. याआधी जे फक्त मार्टिन हिंगिसला जमलं ते करून दाखवण्याची सबालेंकाला संधी होती. पण सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्यात ती अपयशी ठरली. याआधी महिला गटात १९९७ ते १९९९ या कालावधीत मार्टिन हिंगस हिने तीन वेळा ऑस्ट्रेलिन ओपन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला होता. तिचा हा विक्रम अजूनही अबाधित आहे.
मॅडिसन कीज पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासह झाली नवी सम्राज्ञी
अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिने आपल्या टेनिस कारकिर्दीत २०१७ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेची फायनल गाठली होती. पण त्यावेळी तिला जेतेपद मिळवण्यात अपयश आले होते. दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचल्यावर तिने कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली. मेलबर्न पार्कवरील तिच्या या ऐतिहासिक कामगिरीत तिचा पती अन् कोच बियोर्न फ्रेटांजेलो याचा मोलाचा वाटा राहिला. त्यामुळेच मॅच जिंकताच ती आपल्या पतीकडे गेली अन् आनंदअश्रूसह तिने कोच कम नवरोबाला कडकडून मिठी मारली.
अन् ग्रँडस्लॅम विजेत्या नवरोबाची बायकोही झाली ग्रँडस्लॅम क्वीन, कोर्टवर दिसला दोघांच्यातील खास सीन
मॅडिसन कीज हिने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये कोच अन् माजी ग्रँडस्लॅम विजेता टेनिस स्टार बियोर्न फ्रेटांजेलो याच्याशी लग्न केले होते. नवरोबाच्या कोचिंगमध्ये ऐतिहासिक कामगिरीनंतर ग्रँडस्लॅमची नवी सम्राज्ञी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मी खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते. अखेर दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहचल्यावर ते साध्य झाले, अशी प्रतिक्रिया तिने दिली. मेलबर्न पार्कच्या कोर्टवर ऐतिहासिक कामगिरीनंतर मॅडिसन हिने नवरोबाला मारलेली मिठी हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. लग्नानंतर दोघांनी एकमेकांना कोर्टवर खास वेडिंग गिफ्ट दिल्याचा खास सीनच यावेळी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धतील महिला गटातील फायनलमध्ये पाहायला मिळाला. बियोर्न फ्रेटांजेलो हा देखील टेनिसमधील नावाजलेला खेळाडू आहे. २०११ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत डॉमिनिक थिमचा पराभव करत पुरुष एकेरीतील ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारा अमेरिकाचा तो दुसरा टेनिस स्टार आहे. दोघांनी लग्नानंतर एकमेकांना दिलेले हे एक खास वेडिंग गिफ्ट