पॅरिस : फुटबॉलची जादू फक्त या खेळांच्याच चाहत्यांवरच नव्हे, तर गुगलवरदेखील चालली आहे. गुगलने शुक्रवारी सुरू होणाऱ्या युरो कप २0१६ साठी विशेष डुडल बनवले आहे.गुगल नेहमीच विशेषप्रसंगी डुडल बनवते आणि युरो कपप्रती लोकांमध्ये असलेली आवड पाहता त्यावरही एक खास डुडल बनविण्यात आले आहे. त्यामुळे तेदेखील फुटबॉल चाहत्यांशी जोडले गेले आहेत. युरो कपचा उद्घाटनीय सामना यजमान फ्रान्स आणि रोमानिया यांच्यादरम्यान डी’ फ्रान्स स्टेडियममध्ये खेळवला जाईल.डुडलमध्ये हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगात गुगल लिहिण्यात आले आहे. गुगलच्या ‘एल’ला फ्रान्सची ओळख एफिल टॉवरचा आकार देण्यात आला आहे. त्याचबरोबर या विशेष डुडलमध्ये युरो कपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच संघांच्या ध्वजांचा समावेश करण्यात आला आहे. युरो कपसाठी सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे आणि त्यासाठी जवळपास ९0 हजार पोलीस कर्मचारी व सेनेच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. डी’ फ्रान्स या स्टेडियमवर गेल्या वर्षी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात जवळपास १३0 लोकांचा मृत्यू झाला होता. स्पर्धेत एकूण १0 शहरांत सामने खेळवले जातील आणि त्यात २४ संघ सहभागी होत आहेत. त्याआधी इतक्या संघांनी सहभाग घेतला नव्हता. ही स्पर्धा १0 जुलैपर्यंत रंगणार आहे. >रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपाने युरो कपवर परिणामपरिवहनमंत्री अॅलेन विडालिस यांनी शुक्रवारी युरो २0१६ फुटबॉल चॅम्पियनशिप सुरू होण्याच्या काही तास आधी संप पुकारणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, असे सांगितले. विडालिस यांनी युरोप १ रेडियोशी सांगितले की, ‘सरकार सामन्यात चाहत्यांना आणण्यासाठी उपलब्ध साधनांचा उपयोग करील आणि जर आम्हाला रेल्वे सुरू करण्याचा आदेश आला, तर आम्ही सुरू करू.’ गेल्या १0 दिवसांपासून संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा सुरू असण्यास त्यांनी नकार दिला. अधिकारी या मोठ्या फुटबॉल स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास कमी करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. संप करण्यात कोणताही अर्थ नसल्याचेही विडालिस यांनी सांगितले.
गुगलवरही चालली युरो कपची जादू
By admin | Published: June 11, 2016 6:26 AM