चेन्नई: वेटलिफ्टर महादेव वडार याने मुलांच्या ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून सहाव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत टेबल टॉपर महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक पदक जमा केले. पदकतालिकेतील यजमान तामिळनाडूविरुद्धची आघाडी महाराष्ट्राने आणखी मजबूत केली.
सकाळच्या सत्रात नेमबाजी, वेटलिफ्टिंग आणि सायकलिंगमधून प्रत्येकी दोन सुवर्णपदकांपैकी महाराष्ट्राला किमान तीन सुवर्ण जिंकता आली असली. पण, अखेरीस वेटलिफ्टिंगमधून फक्त एक सुवर्ण, एक रौप्य आणि २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक मिळवण्यात यश आले. महाराष्ट्राच्या पदकांची संख्या २९ सुवर्ण, २५ रौप्य आणि ३१ कांस्य अशी आहे.
वडारला फक्त एका क्लीन लिफ्टसह स्नॅच (११३ किलो) आणि क्लीन अँड जर्क (१४० किलो) मध्ये एकूण २५३ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. तामिळनाडूच्या पी आकाशला ११ किलो फरकाने रौप्यपदकावर समाधानी रहावे लागले, तर ओडिशाच्या दीपक प्रधानने कांस्यपदक पटकावले. अंकुश लोखंडेने जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या ६१ किलो गटात एकूण २३७ किलो वजन उचलून रौप्यपदकाची भर घातली. ओडिशाच्या सदानंद बरीहाने त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा पाच किलो जास्त वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.
तत्पूर्वी, केरळच्या सायकलपटू अलानिस लिली क्युबेलिओने मुलींच्या ६० किमी वैयक्तिक रोड शर्यतीत विजेतेपद पटकावले, तर चंदीगडच्या जय डोग्राने ईसीआरमध्ये ३० किमी टाइम ट्रायलमध्ये मुलांमध्ये अव्वल स्थान पटकावले.
गुरु नानक कॉलेज शूटिंग रेंजमध्ये पश्चिम बंगाल आणि तेलंगणा यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक जिंकले. पश्चिम बंगालच्या अश्मित चॅटर्जीने १० मीटर एअर रायफलमध्ये २५०.९ च्या अंतिम स्कोअरसह सुवर्णपदक जिंकले आणि हरियाणाच्या हिमांशूने (२५०.६) आणि राजस्थानच्या मानवेंद्र सिंग शेखवंतने (२२७.६) अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात तेलंगणाच्या के तनिष्क मुरलीधर नायडूने १९ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. आंध्र प्रदेशच्या मुखेश निलावल्ली (१८) आणि महाराष्ट्राच्या स्वराज भोंडवे (१६) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. पदकतालिका https://youth.kheloindia.gov.in/medal-tally
निकालसायकलिंग रोड मुली ६० किमी वैयक्तिक - सुवर्ण - अलानिस लिली क्युबेलिओ ( केरळ) ०१:५७:०४.६४०; रौप्य - संतोषी ओराओन ( झारखंड ) ०१:५७:०४.९५०; कांस्य - जे श्रीमती ( तामिळनाडू ) ०२:०९:५७.९३०
मुले२० किमी टाईम ट्रायल - सुवर्ण - जय डोग्रा ( चंदीगड) ४१:०९.५५०; रौर्य - खेता राम चिगा ( राजस्थान) ४१:२५.०७२; कांस्य - अक्षर त्यागी ( दिल्ली) ४१:२९.९०४
नेमबाजी मुले १० मीटर एअर रायफल: सुवर्ण– अश्मित चॅटर्जी ( पश्चिम बंगाल) २५०.९; रौप्य - हिमांशू ( हरयाणा) २५०.६; कांस्य – मानवेंद्र सिंग शेखावत (राजस्थान ) २२७.६ २५ मीटर रॅपिड फायर: सुवर्ण– के तनिष्क मुरलीधर नायडू ( तेलंगणा) १९; रौप्य - मुकेश निलावल्ली ( आंध्रप्रदेश) १८; कांस्य – स्वराज भोंडवे ( महाराष्ट्र ) १६
व्हॉलिबॉल ( उपांत्य फेरी) मुली - पश्चिम बंगाल वि. वि. गुजरात २५-११, ३०-२८, २५-१९मुले - हरयाणा वि. उत्तर प्रदेश २५-२२, २५-१७, २५-१८
वेटलिफ्टिंगमुले
- ६१ किलो: सुवर्ण- सदानंद बारिहा (ओडीशा) २४२ किलो; रौप्य – अनुष लोखंडे ( महाराष्ट्र ) २३७ किलो; कांस्य - रिकी गोगोई ( आसाम) २३५ किलो
- ६७ किलो: सुवर्ण– महादेव वडार ( महाराष्ट्र ) २५३; रौप्य - पी आकाश ( तामिळनाडू ) २४२; कांस्य – दीपक कुमार प्रधान (ओडीशा) २४२