शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

महाराष्ट्राला दुहेरी विजयाची संधी

By admin | Published: June 13, 2016 4:23 AM

बलाढ्य महाराष्ट्र संघाने केरळचा २१-१२ असा पराभव करत २६ व्या वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेची अंतिम फेरी निश्चित केली.

मुंबई : मध्यांतराला बरोबरी राहिल्यानंतर बलाढ्य महाराष्ट्र संघाने केरळचा २१-१२ असा पराभव करत २६ व्या वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेची अंतिम फेरी निश्चित केली. तर महिलांच्या गटातही केरळला ११-७ असे १ डाव व ४ गुणांनी लोळवून महाराष्ट्राने अंतिम फेरी गाठताना दुहेरी विजेतेपदाची संधी निर्माण केली.भुवनेश्वरला सुरु असलेल्या स्पर्धेच्या पुरुष गटात महाराष्ट्र व केरळ यांच्यात अटीतटीची लढत झाली. दोन्ही संघांनी केलेल्या दमदार खेळामुळे मध्यांतरापर्यंत सामना ८-८ असा बरोबरीत राहिला. दुसऱ्या डावात मात्र महाराष्ट्राने जोरदार आक्रमण करत केरळचे १३ गडी टिपून भक्कम आघाडी मिळवली. महाराष्ट्राच्या संरक्षणात दिपक माने (३.१०मिनिटे) व कर्णधार महेश शिंदे (२.१० व १.३० मिनिटे ) यांनी चमकदार खेळ केला. मध्यांतरानंतर मारलेल्या मुसंडीमुळे महाराष्ट्राने केरळचा २१-१२ असा धुव्वा उडवला. महिला गटातही केरळला महाराष्ट्राकडून पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्राच्या ऐश्वर्या सावंतने पहिल्या डावात तर कविता घाणेकरने दुसऱ्या डावात प्रत्येकी ३.५० मिनिटे संरक्षण केले. त्यांना पोर्णिमा सकपाळेने चांगली साथ दिली. शिवाय आक्रमणातही पोर्णिमाने ३ गडी बाद करुन अष्टपैलू खेळ केला. उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर महाराष्ट्राने केरळचा ११-७ असा १ डाव व ४ गुणांनी नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)>किशोर - किशोरी चमकले२७ व्या सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघांनी आपला दबदबा सिध्द करताना अनुक्रमे कर्नाटक व दिल्लीचा पाडाव करत अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या किशोर संघाने राहूल जाधवच्या (४.१०व २ मिनिटे) जोरावर कर्नाटकचा ९-५ असा १ डाव ४ गुणांनी फडशा पाडला. तर किशोरी संघाने दिल्लीचा ११-४ असा १ डाव व ७ गुणांनी धुव्वा उडवला. पुरुष व महिला संघाच्या अंतिम फेरीनंतर महाराष्ट्राला विजेतेपदासाठी किशोर गटात झारखंड विरुद्ध तर किशोरी गटात कर्नाटकविरुद्ध भिडावे लागेल.