शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महाराष्ट्र केसरी : कोल्हापूरच्या अनिल चव्हाणने पटकावले सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 3:34 PM

उपांत्य फेरीत अनिलने कोल्हापूर जिल्हाच्याच प्रवीण पाटीलला चितपट केले होते.

पुणे : म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या ६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात कोल्हापूर जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळाले. ७४ किलो माती विभागात पैलवान अनिल चव्हाण याने सोलापूरच्या आबासाहेब मदने याला १०-६ गुणांनी हरवत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तत्पूर्वी  उपांत्य फेरीत अनिलने कोल्हापूर जिल्हाच्याच प्रवीण पाटीलला चितपट केले होते. २०१७ साली भुगाव मुक्कामी झालेल्या अधिवेशन मध्ये अनिल चव्हाण याने ७० किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले होते. गेली दोन वर्षापासून जायबंदी असल्यामुळे अनेक दिवस तो कुस्ती खेळापासून दूर होता. पण महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे धडाक्यात पुनरागमन करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच गटात सगळीचा श्रीकांत निकम कांस्य पदकाचा मानकरी ठरला.

७४ किलो माती अंतिम निकाल.सुवर्ण- अनिल चव्हाण (कोल्हापूर)रौप्य- आबासाहेब मदने (सोलापूर)कांस्य- श्रीकांत निकम (सांगली).

आज स्पर्धेच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र केसरी खुल्या गटातील माती व गादी विभागातील चौथ्या फेरीच्या चटकदार व प्रेक्षणीय लढती झाल्या. शेवटच्या सेकंदा पर्यत प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या लढतीत काहींना यश मिळाले, तर काहींना थोडक्यात पराभव पत्करावा लागला. सकाळच्या सत्रात अनुभवी मल्ल  विरुद्ध युवा नव्या दमाच्या मल्लाच्या लढती डोळ्यांचे पारणे फेडणार्या ठरल्या. गादी व माती विभागातील प्रत्येकी ४ लढतीचा निकाल पुढील प्रमाणे.      

■ गादी (मॅट) विभाग चौथी फेरी

१) पैलवान सचिन येलभर  विरुद्ध पैलवान प्रवीण सरक-  सकाळच्या सत्रात पहिल्या लढतीत अनुभवी सचिन येलभरने ही लढत २-१ गुण फरकाने जिकली  

२) पैलवान हर्षवर्धन सदगिर (नाशिक जिल्हा)  विरुद्ध पैलवान संग्राम पाटील (कोल्हापूर) पहिल्या तीन हर्षवर्धन ने पहिल्या मिनटात दोन गुणांची कमाई केली. पुढे थोड्या  अचानक संग्राम पाटील याला पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो लगेच लढायला सज्ज झाला परंतु त्याला आक्रमक कुस्ती करता आली नाही तांत्रिक गुणावर हर्षवर्धन यांनी संग्राम वर विजय मिळवला.

३)  पैलवान सागर बिराजदार (लातूर) आणि पैलवान आदर्श गुंड ही लढत अत्यंत चपळाईने चालू असताना पहिल्या तीन मिनटात आदर्श यांनी दोन गुणांची कमाई केली. दुसऱ्या हाप मध्ये शेवटच्या तीस सेकंदात सागर आक्रमक होऊन पुन्हा तीन गुणांची कमाई केली आणि ही कुस्ती ०३- ०२ ने अशा निसटत्या गुण फरकाने सागर बिराजदार विजयी मिळवत पाचवी फेरी गाठली.

४) पैलवान अभिजित कटके (पुणे शहर) ❌ पैलवान अक्षय मंगवडे (सोलापूर) या कुस्तीत अभिजीत कटके ५-० अधिक गुणाधिक्य वरती विजयी मिळवला होता. 

माती विभाग

१) पैलवान संतोष दोरवड (रत्नागिरी) विरुड पैलवान शैलेश शेळके (लातूर) या लढतीत शैलेशने पहिला हाप मध्ये आक्रमक कुस्ती करत तीन गुणांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या हाप नंतर संतोषचे आक्रमण थोपवित आघाडी कायम ठेवत अधिक गुणाधिक्य विजय मिळवला.

२) माती विभाग मधील दुसरी लढत खुपचं प्रेक्षणीय झाली. हिंगोलीचा पैलवान गणेश जगताप विरुद्ध पैलवान सिकंदर शेख या लढतीत सिकंदरने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेत पहिला हाप मध्ये १ गुणांची कमाई केली. मध्यंतर नंतर सिकंदरने पुन्हा आक्रमक कुस्ती करत पाठीवर ताबा मिळवित दोन गुणांची कमाई केली. मात्र योग्य वेळेची संधीची वाट बघणाऱ्या गणेशने संयमी कुस्ती करत ढाक डावा वरती सिकंदर शेखला चितपट करत उपांत्य फेरीत धडक मारली.

३) माती विभाग मधील तिसरी कुस्ती मागील वर्षीचा महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफिक शेख विरुद्ध पैलवान तानाजी झुजूरके अशी भिडत झाली. या लढतीत बालाने एकेरी पट, दुहेरी पट डावा वरती १० गुणांची आघाडी घेत तांत्रिक गुणाधिक्य वरती विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली.

४) माती विभागमधील शेवटची कुस्ती पैलवान संदीप काळे विरुद्ध पैलवान ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे(सोलापूर) अशी झाली,  या लढतीत माऊलीने दुहेरी पट, हप्ता डावा वरती १० गुणांची आघाडी घेत विजय विजय मिळवला.

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा