पुणे : पहिल्या हॉकी इंडिया फाईव्ह-अ-साईड वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटातून यजमान हॉकी महाराष्ट्र व हॉकी हरियाणा संघांनी रविवारी अंतिम फेरीत धडक दिली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. उपांत्य फेरीत पुरुष गटात गिरीश पिंपळे याने नोंदविलेल्या ३ गोलच्या जोरावर महाराष्ट्र संघाने कर्नाटकचा ५-३ असा पराभव केला. यजमान संघातर्फे गिरीश पिंपळेने ३, २४ व २५व्या मिनिटांना गोल केले. युवराज वाल्मिकी व विक्रम यादव यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात योगदान दिले.दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत हरियाणा संघाने हॉकी ओडिशावर ६-३ ने मात केली. विजयी संघातर्फे प्रीतींदरसिंग व शेरसिंग यांनी प्रत्येकी २, तर हरपालसिंग व जगवंतसिंग यांनी प्रत्येकी १ गोल केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्यपूर्व फेररीच्या लढतीत महाराष्ट्राने झारखंडला नमवले होते. (क्रीडा प्रतिनिधी)> संक्षिप्त निकाल :-उपांत्य फेरी (पुरुष):महाराष्ट्र : ५ (गिरीश पिंपळे ३, २४, २५ वे मिनिट, युवराज वाल्मिकी १० मि, विक्रम यादव १४ मि) वि.वि. कर्नाटक : ३ (व्हीटी रथन १५, २६ मि, अयप्पा एमबी २३ मि). हरियाणा : ६ (प्रितींदर सिंग १, ८ मि, हरपाल सिंग १२ मि, जगवंत सिंग २१ मि, शेर सिंग २६, २७ मि) वि.वि. ओडिशा : ३ (नितीन टिग्गा १७, २४ मि, प्रकाश बारला २३ मि).(महिला) : हरियाणा : ५ (नेहा ३, १० वे मिनिट, मनीषा १, २३, २६ मि.) वि.वि. महाराष्ट्र : २ (पोन्नम्मा मल्लामाडा २ मि, ऐश्वर्या चव्हाण ६ मि).असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटी : ४ (पूजा राणी ८, १७, २६ मि, रीना राणी २९ मि) वि.वि.पंजाब : २ (रामगैझुली राल्टे १२ मि, प्रियांका वानखेडे १३ मि).महाराष्ट्राचा महिला संघ उपांत्य फेरीत पराभूतपुरूष गटातून महाराष्ट्राने फायनलमध्ये धडक दिली असताना महिला गटात मात्र महाराष्ट्राचे आव्हान उपांत्य फेरीत संपले. या गटातून असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटी व हॉकी हरियाणा यांच्यात विजेतेपदाची लढत रंगणार आहे.महिला गटात उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात मनीषा (१, २३, २६ वे मिनिट) हिने नोंदविलेल्या तीन गोलांच्या जोरावर हरियाणा संघाने महाराष्ट्राचा ५-२ ने पराभव करून अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्रातर्फे पोन्नम्मा मल्लामाडा व ऐश्वर्या चव्हाण यांनाच प्रत्येकी १ गोल करता आला.दुसऱ्या उपांत्य सामन्यात असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटी संघाने पंजाबवर ४-२ ने सरशी साधली. वजय मिळवला. विजयी संघाकडून पूजा राणीने (८,१७,२६मि) तीन, तर रीना राणीने एक गोल केला. पराभूत संघाकडून रामगैझुली राल्टे व प्रियांका वानखेडे यांनी प्रत्येकी एक गोल केला.
महाराष्ट्र पुरूष संघ अंतिम फेरीत
By admin | Published: October 31, 2016 4:12 AM