मुंबई : महाराष्ट्र श्रीचा थरार आजवर मुंबई, ठाणे, कोल्हापूर, पुणे या शहरी भागातच अधिक पाहायला मिळालाय. पण शरीरसौष्ठवाची आणि फिटनेसची केझ आता दिवसेंदिवस ग्रामिण भागातही झपाट्याने वाढतेय. ग्रामिण भागातील युवकांमध्ये शरीरसौष्ठवाची केझ वाढावी, त्यांना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी 15 व्या महाराष्ट्र श्रीच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलले आहे. महागणपतीच्या साक्षीने महाराष्ट्र श्रीचा सोहळा स्पर्धा त्याच जोशात जललेषात आणि त्याच दिमाखात येत्या 5आणि 6 मार्चला होणार आहे.
नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे राहणारे आणि टिटवाळ्यात खेळांच्या भव्य स्पर्धा आयोजनाचा जललेष साजरे करणारे नगरसेवक आणि आयोजक संतोष तरे यांनी शहरी भागाप्रमाणे ग्रामिण भागातही महाराष्ट्र श्री स्पर्धा भव्यदिव्य प्रमाणात होऊ शकते, हे दाखवून देण्यासाठीच त्यांनी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी शरीरसौष्ठवपटूंना दिल्या जाणाऱया उत्तम सुविधा टिटवाळ्यातही उपलब्ध केल्या आहेत. तब्बल दोनशे खेळाडूंच्या निवासासह दोन दिवस त्यांना त्यांचा आवडता खुराकही दिला जाणार असल्याचे तरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमी सर्वोच्च असलेल्या महाराष्ट्र श्रीचा थाट यंदाही तसाच असेल. स्पर्धा राज्य अजिंक्यपद असली तरी या स्पर्धेचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनाची जबाबदारी लिलया पार पाडणाऱया महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने होणार आहे. या स्पर्धेतही खेळाडूंनाच प्राथमिकता देण्यात आल्dयाचे संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांनी सांगितले. 6 मार्चला महाराष्ट्र श्रीचा अंतिम सामना रंगणार असून विजेत्याला गतवर्षीप्रमाणे दीड लाखाचा रोख पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर उपविजेत्याला 75 हजारांचे रोख इनाम देऊन गौरविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. एकंदर दहा गटात स्पर्धा रंगणार असून सहा खेळाडूंवर 15, 12, 8, 6, 5 आणि 3 हजार अशा रोख पुरस्कारांची उधळण केली जाईल.
महिलांची ताकद वाढणार
महिलांसाठी फिजीक स्पोर्टस् आणि शरीरसौष्ठव असे दोन्ही गट या स्पर्धेत खेळविले जाणार आहेत. मिस मुंबई स्पर्धेतच सात खेळाडूंच्या सहभागामुळे मिस महाराष्ट्रसाठी महिलांचा आकडा वाढणार हे निश्चित होते. त्यानूसार या स्पर्धेत तब्बल 20 पेक्षा अधिक महिला ऍथलीट खेळणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस ऍड. विक्रम रोठे यांनी दिली. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही सहापेक्षा अधिक पीळदार सौंदर्य मंचावर अवतरणार असल्याचे सांगून स्पर्धा जोरदार होणार असल्याचे संकेत दिले. पुरूषांच्या फिजीक स्पोर्टस् प्रकारातही महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांचा अंतिम आकडा 50 च्या आसपास असेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.
महाराष्ट्र श्रीत सुनीतसमोर कडवे आव्हान
सलग पाचवेळा महाराष्ट्र श्रीचा बहुमान पटकावणाऱया सुनीत जाधवला जेतेपदाचा षटकार ठोकणे फार आव्हानात्मक असेल. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका राज्यस्तरीय स्पर्धेतच त्याची चाहूल लागली आहे. गेल्या चार वर्षात आजवर एकाही स्थानिक स्पर्धेत फक्त विजयासाठीच उतरत असलेल्या सुनीतला धक्का बसला आहे. नवी मुंबईत झालेल्या या स्पर्धेत 85 किलो वजनीगटात सुनीत जाधवसह सागर माळी आणि महेंद्र चव्हाणसारखे तगडे खेळाडू उतरले होते. हा गटच अंतिम सामन्यासारखा होता. दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा शरीरसौष्ठवाच्या मंचावर उतरलेल्dया सागर माळीने सनसनाटी निर्माण केली. त्याने या गटाचे विजेतेपद सुनीत जाधव आणि महेंद्र चव्हाणला धक्का देत मिळविले. सर्वात आश्चर्याचे म्हणजे गटविजेता निवडताना सुनीत जाधवऐवजी सागर माळी आणि महेंद्र चव्हाणची कंपेरिझन घेण्यात आली. सागरने गटविजेतेपद जिंकत आपले जेतेपदही निश्चित केले तर महेंद्र दुसरा आला. सुनीतची धक्कादायकरित्या तिसऱया क्रमांकावर घसरण झाली. या अनपेक्षित निकालामुळे महाराष्ट्र श्रीची चुरस निश्चितच वाढली आहे. या स्पर्धेसाठी महेंद्र पगडे आणि अनिल बिलावा हे जबरदस्त तयारीतले खेळाडूही उतरत असल्यामुळे सुनीत जेतेपदाचा सिक्सर मारतो की बोल्ड होतो, हे पुढच्या आठवड्यातच कळेल.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी राजेश सावंत (9867209971), सुनील शेगडे ( 9223348568) आणि सागर मोरे (9960522168) यांच्याशी संपर्प साधावा असे आवाहन शरीरसौष्ठव संघटेनेचे उपाध्यक्ष मदन कडू यांनी केले आहे.