शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

महाराष्ट्राचा बडोद्यावर विजय

By admin | Published: February 05, 2017 3:59 AM

विजय झोलने अंकित बावणेसोबत केलेली भागीदारी आणि त्यानंतर निखिल नाईक आणि नौशाद शेख यांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या वादळी फलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने

औरंगाबाद : विजय झोलने अंकित बावणेसोबत केलेली भागीदारी आणि त्यानंतर निखिल नाईक आणि नौशाद शेख यांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या वादळी फलंदाजीच्या बळावर महाराष्ट्राने वडोदरा येथे शनिवारी झालेल्या मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य बडोदा संघावर शनिवारी त्यांच्या घरच्या मैदानावर ७ गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला.केदार देवधर (१४) आणि मोनील पटेल (६) हे सलामीवीर ५.१ षटकांत धावफलकावर २९ धावांत गमावल्यानंतर दीपक हुडा आणि युसूफ पठाण यांनी तिसऱ्या गड्यासाठी ९ षटकांतच केलेल्या ८० धावांच्या भागीदारीच्या बळावर बडोदा संघाने २० षटकांत ६ बाद १६८ धावा ठोकल्या. बडोदा संघाकडून युसूफ पठाणने ३५ चेंडूंतच ३ चौकार व ३ षटकारांसह ५६ आणि दीपक हुडा याने ४१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. महाराष्ट्राकडून निकीत धुमाळने १८ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात विजय झोलच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर महाराष्ट्राने विजयी लक्ष्य १९.५ षटकांत ३ फलंदाज गमावून पूर्ण केले. विजय झोलने जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या अंकित बावणे याच्या साथीने ५६ चेंडूंतच दुसऱ्या गड्यासाठी ७६ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राच्या विजयाचा भक्कम पाया रचला. त्यानंतर निखिल नाईक आणि नौशाद शेख यांनी १३ चेंडूंत नाबाद ४० धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राच्या चित्तथरारक विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राकडून विजय झोलने सर्वाधिक ५० चेंडूंत सणसणीत ९ चौकार आणि एका टोलेजंग षटकारासह ६४ धावा केल्या. निखिल नाईकने १२ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह नाबाद २६, अंकित बावणे याने २८ चेंडूंत २ चौकार, एका षटकारासह २४, स्वप्निल गुगळेने २३ चेंडूंत ५ चौकारांसह २४ आणि नौशाद शेखने मोक्याच्या क्षणी अवघ्या ६ चेंडूंतच ३ षटकारांसह वादळी नाबाद २१ धावांची निर्णायक खेळी केली. बडोदा संघाचा कर्णधार इरफान पठाण सर्वात महागडा गोलंदाज ठरला. इरफानने त्याच्या ४ षटकांत ४७ धावा मोजल्या.संक्षिप्त धावफलकबडोदा : २० षटकांत ६ बाद १६८. (दीपक हुडा ५३, युसूफ पठाण ५६. निकीत धुमाळ ३/१८, अनुपम संकलेचा १/३५, स्वप्निल गुगळे १/४).महाराष्ट्र : १९.५ षटकांत ३ बाद १६९. (विजय झोल ६४, निखिल नाईक नाबाद २६, अंकित बावणे २४, स्वप्निल गुगळे २४, नौशाद शेख नाबाद २१. आर. आरोठे १/३८, बी. पठाण १/२९, स्वप्निल सिंग १/२५).