शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

महाराष्ट्राचा ‘चौकार’

By admin | Published: June 14, 2016 3:36 AM

चुरशीच्या रंगलेल्या सामन्यात महाराष्ट्राने तुल्यबळ कोल्हापूरचा १६-१३ असा पाडाव करून २६ व्या वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत पुरुष गटाच्या जेतेपदाला गवसणी घातली.

मुंबई : चुरशीच्या रंगलेल्या सामन्यात महाराष्ट्राने तुल्यबळ कोल्हापूरचा १६-१३ असा पाडाव करून २६ व्या वरिष्ठ गटाच्या फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत पुरुष गटाच्या जेतेपदाला गवसणी घातली. तर महाराष्ट्राच्या महिलांनी कर्नाटकला ११-८ असे नमवत स्पर्धेत दुहेरी अजिंक्यपद मिळवण्याचा मान पटकावला. त्याचवेळी महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघांनीदेखील आपआपल्या अंतिम सामन्यात बाजी मारून २७व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. भुवनेश्वर येथे झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेच्या पुरुष गटात महाराष्ट्राने कसलेल्या कोल्हापूरविरुद्ध धमाकेदार सुरुवात केली. कोल्हापूरकरांनीदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले. महेश शिंदे (१.३०, ३ मिनिटे) आणि दीपक माने (३ मिनिटे) यांनी दमदार संरक्षण केले. तर प्रयाग कनगुटकरने २ व १.२० मिनिटे संरक्षण व एक बळी घेत अष्टपैलू खेळ केला. आक्रमणात नितीन ढोबळेने ५ गडी बाद केले. मध्यांतराला ७-६ अशी आघाडी राखल्यानंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात ९-७ असे वर्चस्व राखून कोल्हापूरकरांना नमवले.त्याच वेळी महिला गटात मात्र अडखळती सुरुवात झाल्याने महाराष्ट्र संघ मध्यांतराला कर्नाटकविरुद्ध २ गुणांनी २-४ असा पिछाडीवर होता. मात्र दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळाच्या जोरावर जबरदसत मुसंडी मारताना महाराष्ट्राने ९-४ अशी आघाडी घेत कर्नाटकच्या हातातील विजेतेपद हिसकावून आणले. ऐश्वर्या सावंत (३.३० व ३.२५ मिनिटे), श्वेता गवळी (२.४५ मिनिटे) आणि कविता घाणेकर (२.१५) यांनी निर्णायक संरक्षण केले. तर शीतल भोरने ५ बळी घेताना कर्नाटकचे कंबरडे मोडले. कर्नाटककडून सिंधू पी., मेधा के. एस. आणि जयश्री यांनी अपयशी झुंज दिली. (क्रीडा प्रतिनिधी)ज्युनिअर्सचाही ‘डबल धमाका’‘फेडरेशन चषक’ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिनिअर्स संघांनी वर्चस्व राखल्यानंतर किशोर - किशोरी संघांनी २७ व्या सब-ज्युनियर गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारून संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा राखला.महाराष्ट्राच्या किशोर संघाने सहज विजेतेपद उंचावताना झारखंडचे आव्हान ८-७ असे एक गुण व २.३० मिनिटे राखून परतावले. शुभम थोरातने (२.३० आणि ५ मिनिटे) अफलातून संरक्षण करताना झारखंडच्या आव्हानातली हवा काढली. त्याचवेळी आदित्य देसाई, ॠतिक भोर यांचा अष्टपैलू खेळ व राहुल जाधवचे उत्कृष्ट संरक्षणही महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक ठरले.दुसरीकडे किशोरी अंतिम सामन्यात पहिल्या डावात ४-५ असे पिछाडीवर पडल्यानंतर महाराष्ट्राने कर्नाटकवर ११-०९ असा २ गुणांनी विजय नोंदवला. हर्शदा करेचा अष्टपैलू खेळ आणि साक्षी करे, ऋतुजा हाके व प्राची कार्डिले यांचे दमदार संरक्षण यापुढे कर्नाटकचा निभाव लागला नाही. प्राजक्ता चितळकरने उत्कृष्ट आक्रमण केले.