पुणे : पुण्याचा गुणवान राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशी याने शुक्रवारी आत्महत्या केल्याने क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. २१ वर्षीय साहिल याने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेतला. वारंवार फोन करूनही मुलगा प्रतिसाद देत नाही म्हणून वडील ऑफिसमधून घरी गेले असता ही घटना उघडकीस आली. आई-वडिलांचा एकुलता मुलगा असलेला साहिल एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गाला होता. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करताना साहिलने तब्बल ७ सुवर्णपदके जिंकली होती. राज्यस्तरीय स्पर्धांत तर त्याने कायम पदकांची लयलूट केली, अशी माहिती त्याचे प्रशिक्षक मनोज एरंडे यांनी दिली. आपल्या एका प्रतिभावान विद्यार्थ्याने अशा प्रकारे आयुष्य संपविल्याने त्यांना धक्का बसला आहे. खेळाचे प्रशिक्षण देताना आम्ही मुलांना अपयशाला कसे सामोरे जावे, हे शिकवत असतो. कुठलेही कारण असो, साहिलसारख्या गुणवान खेळाडूने असे टोकाचे पाऊल उचलले, यावर माझा विश्वास बसत नाही. एकुलत्या मुलाने अशा पद्धतीने आयुष्य संपविल्यावर त्याच्यासाठी खस्ता खाणाऱ्या आई-वडिलांची कोणत्या शब्दांत समजूत काढणार, अशा शब्दांत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले.
महाराष्ट्राचा राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 18:19 IST
वारंवार फोन करूनही मुलगा प्रतिसाद देत नाही म्हणून वडील ऑफिसमधून घरी गेले असता ही घटना उघडकीस आली.
महाराष्ट्राचा राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या
ठळक मुद्देराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करताना साहिलने तब्बल ७ सुवर्णपदके जिंकली होती.