शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व; कोल्हापूरकर चमकले

By admin | Published: January 16, 2017 4:32 AM

अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले.

महेश चेमटे,

मुंबई : अर्धमॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या धावपटूंचे वर्चस्व दिसून आले. महिला गटात नाशिकच्या अनुभवी मोनिका आथरेने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करताना सुवर्ण पदकावर नाव कोरले. तर कोल्हापूरच्या मीनाक्षी पाटीलने रौप्य पदक पटकावले. उत्तर प्रदेशच्या अनुराधा सिंगला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तामिळनाडूच्या जी.लक्ष्मणनने आपल्या पहिल्याच मॅरेथॉनमध्ये सुवर्ण कमाई करताना पुरुष गटात बाजी मारली, तर सचिन पाटील आणि गतविजेता दीपक कुंभार या कोल्हापूरच्या धावपटूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्य मिळवले.भिलाई येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रॉसकन्ट्री स्पर्धेमुळे यंदा अर्धमॅरेथॉनला कमी प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. महिलांमध्ये १० किमी अंतरानंतर मिनाक्षीने आघाडी घेतली. मात्र, शेवटच्या टप्प्यात अनुभवी मोनिकाने निर्णायक आघाडी घेत, १ तास १९ मिनिटे १३ सेंकद अशी वेळ नोंदवत सुवर्ण पदक पटकावले, तर मीनाक्षीने १ तास २० मिनिटे ५३ सेकंदात रौप्य पदक मिळवले. उत्तर प्रदेशच्या (लखनऊ) अनुराधाने १ तास २५ मिनिटे २० सेंकद वेळेसह कांस्य पदक जिंकले.पुरुषांमध्ये प्रथमच सहभागी झालेल्या लक्ष्मणनने १ तास ५ मिनिटे ५ सेंकदाची वेळ नोंदवत सुवर्ण निश्चित केले, तर यानंतर द्वितीय क्रमांकासाठी सचिन व दीपक यांच्यात चुरशीची स्पर्धा रंगली. १० किमी अंतर दोघांनीही एकाच वेळेत पूर्ण केले. मात्र, अंतिम रेषा जवळ येताच सचिनने वेग वाढवताना १ तास ६ मिनिटे २२ सेंकद वेळेसह रौप्य पटकावले, तर गतविजेत्या दीपकला १ तास ६ मिनिटे २८ सेकंद वेळेसह कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.>मॅरेथॉनमध्ये यंदाचे सहावे पदक आहे. दिल्ली मॅरेथॉन विजयी वेळेत पूर्ण केल्याने आत्मविश्वास वाढला. त्यानंतर, भोपाळ, हैद्रराबाद, वसई-विरार, कोलकातामध्ये कामगिरी उंचावली. यंदाची अर्धमॅरेथॉन ही माझी शेवटची अर्धमॅरेथॉन असून, यापुढे मी ४२ किमीसाठी धावेन. २६ फेब्रुवारीला होणाऱ्या दिल्ली मॅरेथॉनमध्ये विक्रमी वेळ नोंदवत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पात्रता मिळवण्याचे लक्ष्य आहे.- मोनिका आथरे, विजेती - अर्धमॅरेथॉन२०१२ पासून आजपर्यंत एकाही अर्धमॅरेथॉनमध्ये पहिला क्रमांक सोडला नाही. त्यामुळे येथेही आत्मविश्वासाने सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात येथे विजयी झाल्याचा आनंद आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर लष्करात दाखल झाल्याने कारकिर्दीला योग्य दिशा मिळाली.- जी.लक्ष्मणन, विजेता - अर्धमॅरेथॉनसहभागी प्रतिस्पर्ध्यांपैकी माझी कामगिरी अधिक चांगली असल्याने मला जिंकण्याचा विश्वास होता. मी माझी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली असली, तरी याहून चांगली वेळ मल नोंदवायची होती. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्रवेश निश्चित करण्यासाठी मला आणखी ५ मिनिटांनी कामगिरी सुधारावी लागेल.- ज्योती गवाते, विजेती - भारतीय महिला पुर्ण मॅरेथॉन.या आधी २०१५ साली मी मुंबई मॅरेथॉनमध्ये धावले होते. तेव्हाच्या तुलनेत मी यंदा २ मिनिटांनी अधिक वेळ नोंदवली. त्यामुळे मला आणखी सुधारणा करण्याची गरज आहे.- श्यामली सिंग, द्वितीय भारतीय महिला पुर्ण मॅरेथॉनपूर्ण मॅरेथॉनमध्ये पहिल्यांदाच सहभागी होताना मिळवलेल्या पदकाचा खूप आनंद आहे. यासाठी मी माझे प्रशिक्षक सॅव्हीओ डिसूझा यांचे आभार मानते. त्यांनी खूप मेहनत घेतली. - जिगमेट डोल्मा, तृतीय भारतीय महिला पुर्ण मॅरेथॉन.>पायलटची मदत...गतविजेत्या दीपक कुंभारचे तिसरे स्थान यंदाचा अनपेक्षित निकाल ठरला. मात्र, सचिनला धावताना पायलटची मदत झाली. नाहीतर माझे दुसरे स्थान नक्कीच हुकले नसते, अशा शब्दांत दीपकने आपली निराशा व्यक्त केली.याबाबत दीपक म्हणाला, ‘शर्यतीत ५ किमी आणि १० किमी मी आणि सचिन बरोबरीत होतो. १२ किमीनंतर मी आघाडी घेतली. आघाडीवरील धावपटूचा पायलट सचिनच्या परिचयाचा असल्याने तो त्याच्या बरोबर राहिला.याचा फायदा घेत सचिनने अखेरची ४ किमी बाकी असताना मला गाठून, अखेरचे ५०० मीटर बाकी असताना आघाडी घेत रौप्य पदक मिळवले. तो पायलट नसता तर रौप्यपदकाचा निकाल वेगळा लागला असता.’ ‘त्या’ पायलटविषयी अर्धमॅरेथॉनचे प्रमुख होमियार मेस्त्री म्हणाले की, ‘सर्व नियमांनुसार झाले. आघाडीच्या धावपटूंच्या आसपास अधिकृत पायलट असतो. तो पायलट अधिकृत होता आणि त्याला सूचना देण्यात आल्या होत्या. मुळात धावण्याचा मार्ग मोठा होता. त्यामुळे यात काहीच आश्चर्य नाही.’ तर सचिन याबाबत म्हणाला, ‘गेली ९ वर्षे मी मुंबईत सराव करतो. त्यामुळे मुंबईतील बहुतांशी धावपटू, प्रशिक्षकांशी ओळख आहे. मला कोणाचीही मदत झाली नसून मोक्याच्या वेळी कामगिरी उंचावून बाजी मारली.’