ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18, आयपीएलच्या दहाव्या हंगामास अजून बराच अवकाश असला तरी आयपीएलमधील संघानी नव्या हंगामाच्या तयारीस सुरुवात केली आहे. दोन वेळा आयपीएलच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या मुंबई इंडियन्सने नव्या हंगामासाठी संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी महेला जयवर्धनेकडे सोपवली आहे. जयवर्धने रिकी पाँटिंगची जागा घेणार आहे.
एकदिवसीय, कसोटी आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमधील आघाडीच्या फलंदाजांमध्ये जयवर्धनेचे नाव घेतले जाते. तसेच कर्णधार म्हणूनही त्याने उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. तसेच आयपीएलमध्येही त्याने आपल्या खेळाची छाप पाडली होती. दरम्यान, 2015 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्ती स्वीकारणाऱ्या जयवर्धनेसमोर प्रशिक्षक म्हणून चांगली छाप पाडण्याचे आव्हान असेल. जयवर्धनेपूर्वी रिकी पाँटिंगने सलग चार मोसमांमध्ये मुंबईच्या प्रशिक्षकपदाची जबाबदार यशस्वीपणे सांभाळली होती. यादरम्यान, मुंबईने दोन वेळा आयपीएलच्या विजेतेपदालाही गवसणी घातली होती. मात्र गेल्या हंगामात रिकी पाँटिंगच्या मुंबई इंडियन्सची कामगिरी लौकिकाला साजेशी झाली नव्हती.
Mahela Jayawardene to be the new head coach of Mumbai Indians #IPL— ANI (@ANI_news) 18 November 2016