शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

महेंद्रसिंह धोनीने नाकारला सलोखा

By admin | Published: July 17, 2014 12:46 AM

जडेजा - अ‍ॅँडरसन यांच्यातील वादाने आठवडा ढवळून निघाला असतानाच इंग्लडने मात्र पत्रकारांना इमेल पाठवून ते आपला खेळाडू अ‍ॅँडरसनच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले.

अजय नायडू, लंडनजडेजा - अ‍ॅँडरसन यांच्यातील वादाने आठवडा ढवळून निघाला असतानाच इंग्लडने मात्र पत्रकारांना इमेल पाठवून ते आपला खेळाडू अ‍ॅँडरसनच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना (आयसीसी)ने अ‍ॅँडरसनला लेव्हल ३ च्या गुन्हाबद्दल शिक्षा होऊ शकते असे स्पष्ट केले आहे.या बातमीने सर्वांनाच आश्चर्यात टाकले आहे. कारण भारत, आॅस्ट्रेलिया आणि इंग्लड हे क्रिकेटमधील ‘बिग थ्री’ म्हणून ओळखले जातात. या तिनही मंडळाकडे क्रिकेटची सत्ता एकवटली असताना या वादामुळे हे संबध बिघडू नयेत याची दक्षता घेण्यात येत आहे. मात्र कर्णधार धोनीने या वादात पडत सलोख्याचे प्रयत्न धुुडकावले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सलोख्याचे प्रयत्न चालवले होते. मात्र धोनी आपल्या मतावर ठाम आहे.नॉटिंगहॅम कसोटीत पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडला. गुरुवारी उपहाराला मैदानावरुन परत येत असताना जडेजाला अ‍ॅण्डरसनने शिवीगाळ केली तसेच धक्का दिला. मात्र परत पॅव्हेलियनमध्ये येत असताना अण्डरसने जडेजाला धक्का दिल्यामुळे परिस्थिती चिघळली.यावेळी जडेजासमवेत धोनीही तेथे होता. त्यामुळे त्याने अधिकृत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. धोनी हा सभ्य खेळाडू म्हणून ओळखला जातो. अ‍ॅण्डरसने आपल्या मर्यादा ओलंडल्या असल्याचे अनेकांचे म्हणने आहे. अशा प्रकारच्या वर्तणूकीला कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाऊ नये असे भारतीय कर्णधाराचे म्हणने आहे.भारताने या प्रकारची अधिकृत तक्रार दाखल केली असून इंग्लडनेही आपल्या खेळाडूची पाठराखण करण्यास प्रारंभ केला आहे. अ‍ॅण्डरसने जडेजाच्या कृतीचा फक्त प्रतिकार केला असे त्यांचे म्हणणे आहे. भारताचे व्यवस्थापक सुनील देव म्हणाले,‘ हा खरंच गंभीर प्रकार आहे. तुम्ही कोणाला धक्का मारु शकत नाही. यामुळेच मी सामन्याधिकाऱ्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला.’