शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

अफगाणिस्तान मुख्य फेरीत

By admin | Published: March 13, 2016 4:22 AM

मोहंमद नबीच्या अर्धशतकापाठोपाठ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात वर्चस्व गाजविणाऱ्या अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषकाच्या ‘ब’ गटाच्या निर्णायक पात्रता लढतीत

किशोर बागडे, नागपूरमोहंमद नबीच्या अर्धशतकापाठोपाठ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात वर्चस्व गाजविणाऱ्या अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषकाच्या ‘ब’ गटाच्या निर्णायक पात्रता लढतीत शनिवारी झिम्बाब्वेचा ५९ धावांनी धुव्वा उडवून पहिल्यांदाच दिमाखात मुख्य फेरी गाठली.अफगाण संघ मुख्य फेरीत ग्रुप १ मध्ये इंग्लंड, द. आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंंडीज यांच्यासोबत खेळणार आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर झालेल्या या लढतीत अफगाण संघाने झिम्बाब्वेवर चौफेर वर्चस्व गाजविले. मोहंमद नबी ‘सामनावीर’ ठरला.अफगाणिस्तानच्या ६ बाद १८६ धावांना उत्तर देणारा झिम्बाब्वे संघ १९.४ षटकांत १२७ धावांत बाद झाला. आठव्या स्थानावर आलेल्या पेनयांगाराच्या ७ चेंडूंतील सर्वाधिक नाबाद १७ धावांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. सिकंदर रझाने १५, सीन विल्यम्सने १३, सिबांडाने १३ आणि हॅमिल्टन मस्कद्जा याने ११ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून राशीद खान याने ४ षटकांत ११ धावांत सर्वाधिक ३ बळी घेतले. हमीद हसन याने दोन तसेच दौलत झदरान, समीउल्लाह शेनवारी, मोहंमद नबी आणि असगर स्तानिकजई यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.त्याआधी, मधल्या फळीचा आधारस्तंभ असलेल्या मोहंमद नबीने ४ चौकार आणि एका षटकारासह सर्वाधिक ५२ धावा केल्या. त्याने समीउल्ला शेनवारीसोबत पाचव्या गड्यासाठी ६४ चेंडूत ९८ धावांची भागीदारी करू धावसंख्येला आकार दिल्याने २० षटकांत ६ बाद १८६ पर्यंत मजल मारता आली. शेनवारीने ४ चौकार व एका षटकारासह ४३, तर सलामीवीर शहजाद याने ७ चौकारांसह ४० धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेने दिलेल्या अवांतर २५ धावांत १७ वाईड चेंडूंचा समावेश होता. मध्यमगती गोलंदाज पेनयांगराने ३ गडी बाद केले. शहजादने सुरुवातीपासून आक्रमक फटकेबाजी करून तेंदई चतारा याला सलग ३ चौकार ठोकले. शहजादनेच तिरीपानो याला चौथ्या षटकांत पुन्हा सलग ३ चौकार लगावले. आपल्या वादळी खेळीत त्याने ७ चौकार आणि एक षटकार लगावला. अखेर पाचव्या षटकात सीन विल्यम्सने शहजादला कर्णधार हॅमिल्टन मस्कद्झाकरवी झेलबाद केले आणि झिम्बाब्वेला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अफगाण संघाचा कर्णधार असगर स्तॅनिकझाई हा मैदानावर आला; मात्र प्यानगारा याने त्याला झटपट तंबूत परतवले. सिंकदर रझा याने त्याचा अप्रतिम झेल घेतला. त्यानंतर आलेल्या गुुलाबदीन नबीलाही वैयक्तिक ७ धावसंख्येवर प्यानगारानेच त्रिफळाचीत केले. दुसरा सलामीवीर नूर अली झरदानही त्यानंतर लगेच बाद झाला. १ बाद ४९ धावसंख्येवरून अफगाण संघ ४ बाद ६३ वर पोहोचला.संक्षिप्त धावफलकअफगाणिस्तान : २० षटकांत ६ बाद १८६ धावा (मोहंमद नबी ५२, समीउल्लाह शेनवारी ४३, मोहंमद शहजाद ४०, नूर अली जरदान १०, पेनयांगारा ३२/३, सीन विल्यम्स २५/१, तिरिपानो ४१/१)झिम्बाब्वे : १९.४ षटकांत सर्व बाद १२७ धावा (पेनयांगारा १७, सिकंदर रझा १५, सीन विल्यम्स १३, सिबांडा १३, मस्कद्जा ११, मुतुम्बामी १०, एल्टन चिगंबुरा १०, राशीद खान ११/३, हमीद हसन ११/२, दौलत जदरान, समीउल्लाह शेनवारी, मोहंमद नबी, असगर स्तानिकजई प्रत्येकी एक बळी).>> हा अफगाणिस्तानच्या जनतेसाठी मोठा विजय आहे, या शब्दांत झिम्बाब्वेवरील विजयाचे वर्णन अफगाणिस्तानचा कर्णधार असद स्तानिकजई याने टी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील महत्त्वाचा विजय देशवासियांना समर्पित केला.व्हीसीएवर विजयानंतर आनंदी झालेला स्तानिकजई पत्रकारांशी बोलताना म्हणाला, ‘आम्ही याआधी २०१० आणि २०१२ मध्ये टी-२० विश्वचषकात खेळलो. त्या वेळी थेट प्रवेश मिळाला होता. यंदा पहिल्यांदा पात्रता फेरीचा अडथळा दूर करीत अफगाणिस्तानने सलग तीन विजयांसह मुख्य फेरीत धडक दिली आहे.’ आशिया चषकात चांगला खेळ करूनही पात्रता फेरी गाठू शकलो नव्हतो. त्यामुळे येथे चांगला खेळ करण्याचे आव्हान होते. देशातील जनतेला आनंद देणारा हा विजय आहे. मैदानावरही आमच्या चाहत्यांनी भक्कम पाठिंबा दर्शविल्याने आमच्या उत्साहात भर पडू शकली. विश्वचषकाच्या मुख्य फेरीत खेळणे ही आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे. सलामीवीर मोहम्मद शहजाद व मधल्या फळीतील फलंदाज गुलबदिन नबी यांच्या प्रयत्नांचे कर्णधाराने तोंडभरून कौतुक केले.