शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

लंकेवर वर्चस्व राखण्याचा द. आफ्रिकेचा प्रयत्न

By admin | Published: June 03, 2017 12:56 AM

बलाढ्य फलंदाजी तसेच भेदक गोलंदाजीच्या बळावर जेतेपदाच्या दावेदारांमध्ये गणला जाणारा द. आफ्रिका संघ ओव्हलवर श्रीलंकेविरुद्ध

लंडन : बलाढ्य फलंदाजी तसेच भेदक गोलंदाजीच्या बळावर जेतेपदाच्या दावेदारांमध्ये गणला जाणारा द. आफ्रिका संघ ओव्हलवर श्रीलंकेविरुद्ध आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पहिला सामना आज, शनिवारी खेळणार आहे. आफ्रिकेने लंकेवर नेहमीच सरशी साधली असल्याने या सामन्यात वर्चस्व कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आफ्रिकेने लंकेविरुद्ध खेळलेले सर्व सातही वन-डे जिंकले. त्यात फेब्रुवारीत झालेल्या पाच सामन्यांचा देखील समावेश आहे. २०१५च्या विश्वचषकात सिडनीत झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत आफ्रिकेने लंकेला १३३ धावांत गुंडाळून नऊ गड्यांनी शानदार विजय मिळविला होता. वन डे मध्ये अव्वल स्थानावर असलेल्या आफ्रिकेची दुसरी बाजू अशी की आयसीसी स्पर्धेत त्यांचे रेकॉर्ड फारसे चांगले नाही. ‘चोकर्स’चा डाग पुसून काढण्यास आफ्रिकेचे खेळाडू आसुसले आहेत. द. आफ्रिकेने १९९८ मध्ये पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली पण हा अपवाद वगळात त्यांना एकही आयसीसी स्पर्धा अद्याप जिंकता आली नाही. आफ्रिकेचा संघ संतुलित आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावरील फलंदाज डिव्हिलियर्स आणि नंबर वन गोलंदाज कासिगो रबाडा हे दोघेही त्यांच्या संघात आहेत. अनुभवी हाशिम अमला, डुप्लेसिस, जेपी ड्यूमिनी, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, व्हेन पार्नेल हे सर्व हुकमी खेळाडू आहेत. आयसीसी रँकिंगमध्ये या संघाचे चार फलंदाज आणि दोन गोलंदाज पहिल्या दहा जणांत आहेत.