आयपीएल फिक्सिंग : सुनावणी गुरुवार्पयत लांबणीवर
नवी दिल्ली : आयपीएलच्या सहाव्या पर्वातील फिक्सिंग व सट्टेबाजीप्रकरणी न्या. मुकुल मुद्गल यांच्या चौकशी समितीने सादर केलेला चौकशी अहवाल तसेच त्यात गुंतलेल्या खेळाडूंची नावे सार्वजिनिक करण्याची मागणी याचिकाकत्र्याने मंगळवारी सुप्रीम कोर्टाकडे केली. दरम्यान, कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवार्पयत पुढे ढकलली आहे.
याचिकाकर्ते क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांचे वकील हरीश साळवे यांनी कोर्टाला विनंती करून बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पुन्हा एकदा निवडणूक लढण्याची परवानगी देऊ नये. बोर्डाच्या कामकाजापासून दूर असलेले श्रीनिवासन यांच्या मालकीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघालादेखील बेदखल करण्यात यावे, अशी मागणी केली. कोर्टात सुनावणीच्या वेळी तणावपूर्ण वातावरण होते. साळवे यांनी 2 तास युक्तिवाद केला; पण कोर्टाने कुठलेही निरीक्षण न नोंदविता सुनावणी 27 नोव्हेंबर्पयत पुढे ढकलली.
आपल्या युक्तिवादात साळवे म्हणाले, ‘‘सीएसकेचे अधिकारी आणि श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन हा फिक्सिंगप्रकरणी आरोपी असल्याने सीएसके संघ रद्द करण्यात यावा. याशिवाय संपूर्ण चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यात यावा. मुद्गल समितीने 35 पानांचा अहवाल न्यायालयाला दिला आहे; पण यातील निवडक भाग सार्वजनिक करण्यात आला. सोमवारी कोर्टाने सुनावणीच्या वेळी श्रीनिवासन यांच्यावर ताशेरे ओढून एक व्यक्ती बीसीसीआय प्रमुख आणि संघाचा मालक कसा, हा प्रश्न उपस्थित केला. दोन्ही ठिकाणी तुमचे हितसंबंध गुंतले असल्याने बोर्डाचे प्रमुखपद प्रभावित होत असल्याचेही ठणकावले होते.
मंगळवारी साळवे यांनी श्रीनिवासन यांच्यावर जावई मयप्पनचा बचाव करीत असल्याचा आरोप केला. सट्टेबाजीत संशयित असलेला मयप्पन हा क्रिकेट चाहता नव्हे, तर सीएसकेचा अधिकारी असल्याचे पुराव्यावरून सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)
च्आयपीएल भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणणारे क्रिकेट असोसिएशन ऑफ बिहारचे सचिव आदित्य वर्मा यांनी फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणात सुप्रीम कोर्ट ऐतिहासिक निर्णय देईल, असा आशावाद व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होणार होती; पण गुरुवार्पयत लांबली.
च्त्यानंतर कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना वर्मा यांनी ऐतिहासिक निर्णय येण्याची अपेक्षा वर्तविली. ते पुढे म्हणाले, ‘‘क्रिकेटचे भविष्य ठरविणारा हा ऐतिहासिक निकाल असेल. या देशात क्रिकेट हा धर्म बनला आहे. खुद्द माङया वडिलांचे निधन क्रिकेट सामना पाहताना झाले.’’
च्न्यायालयात आणखी काही खुलासे होताच श्रीनिवासन यांच्याबाबतचे सत्य आणखी उलगडेल. ते दुस:यांदा बीसीसीआय प्रमुख बनू नयेत, असे आम्हाला वाटते. बोर्डाचे प्रमुख आणि सीएसकेचे मालक असे दोन्हीकडे त्यांचे संबंध गुंतले आहेत. त्यामुळेच ते पुन्हा अध्यक्ष झाल्यास क्रिकेटचे दुर्दैव ठरेल.’’