शहरं
Join us  
Trending Stories
1
'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा
2
हे बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगही तपासल्यात; भाजपचा उद्धवना टोला, व्हिडिओच दाखवला
3
Chitra Wagh : "...तर माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही"; भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्टच सांगितलं
4
"हिंदूंवर होणारे हल्ले थांबले नाहीत तर…", भाजप नेत्याचा बांगलादेश सरकारला इशारा
5
एलॉन मस्क आणि भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींवर ट्रम्प यांनी सोपवली मोठी जबाबदारी, सरकारमध्ये केला समावेश
6
Vaikunth Chaturdashi 2024: मृत्यूनंतर वैकुंठाचीच प्राप्ती व्हावी म्हणून 'असे' केले जाते वैकुंठ चतुर्दशीचे व्रत!
7
रुपाली गांगुलीच्या सावत्र लेकीने डिलीट केलं ट्वीटर, अभिनेत्रीने दाखल केला होता मानहानीचा खटला
8
Budh Pradosh 2024: बुद्धी, सिद्धि आणि संपत्तीप्राप्तीसाठी आज सूर्यास्ताला करा बुध प्रदोष व्रत!
9
IND vs AUS: ना विराट, ना स्मिथ.. 'हे' दोघे ठरतील कसोटी मालिकेतील 'गेमचेंजर'- आरोन फिंच
10
याला म्हणतात जिद्द! १६ वेळा अपयशी, तरीही मानली नाही हार; आज आहे असिस्टंट कमांडंट
11
सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान इस्रायलवर संतापले; म्हणाले, "गाझावरील हल्ला हा..."
12
"...तर हात तोडल्याशिवाय राहणार नाही"; बच्चू कडूंचा काँग्रेस-भाजपला इशारा
13
Swiggy IPO Listing: ₹३९० चा शेअर ₹४२० वर लिस्ट; इथेही Zomato पेक्षा मागे पडली कंपनी
14
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
15
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जितकी कराल गुंतवणूक, मॅच्युरिटीवर मिळतील दुप्पट पैसे; कोणाला घेता येणार लाभ?
16
ऑस्करसाठी 'लापता लेडीज' च्या नावात बदल, किरण रावने रिलीज केलं नवीन पोस्टर
17
Maharashtra Election 2024 Live Updates: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज तोफ धडाडणार!
18
'तुमची ताकद किती समजून जाईल'; गणेश नाईकांसमोरच फडणवीसांचा संदीप नाईकांना सूचक इशारा
19
Stock Market Highlights: शेअर बाजारात आजही घसरण; Nifty २३,९०० च्या खाली, सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये
20
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका

भारतासाठी ‘करा किंवा मरा’

By admin | Published: January 17, 2016 3:26 AM

पहिल्या दोन्ही लढतींत गोलंदाजांच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेल्या भारतीय संघावर आज रविवारी तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याचे दडपण असेल.

मेलबोर्न : पहिल्या दोन्ही लढतींत गोलंदाजांच्या नाकर्तेपणाचा फटका बसलेल्या भारतीय संघावर आज रविवारी तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळविण्याचे दडपण असेल. भारताने दोन्ही सामन्यांत ३०० वर धावा केल्यानंतरही पराभवाची निराशाच पदरी पडली. गोलंदाज अपयशी ठरल्याने आता विजयासाठी फलंदाजांनाच अतिरिक्त जबाबदारी उचलावी लागेल, अशी कबुली कर्णधार धोनीने दिलीच आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत उमेद कायम राखण्यासाठी तिसरा सामना महत्त्वाचा असल्याची जाणीव भारताला आहे. बांगलादेशात वन डे मालिका गमविल्यानंतर घरच्या मैदानावरही द. आफ्रिकेकडून पराभव पत्करावा लागला होता. आता उद्याचा सामना गमविल्यास सलग तिसरी मालिका गमविण्याचा डाग टीम इंडियावर लागणार आहे. धोनीसाठी हे चांगले चित्र नाही. मागच्यावर्षी पराभवानंतर त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. त्याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घ्यायला हवी, असे मत व्यक्त झाले. बीसीसीआयने यावर मंथन करीत २०१६ च्या टी-२० विश्वचषकापर्यंत माहीकडे नेतृत्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.झिम्बाब्वे दौऱ्यात धोनी नव्हता, पण पुनरागमनानंतरही त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. नावलौकिकानुसार खेळ अद्याप कायम आहे, हे दाखवून देण्याचे आव्हान धोनीपुढे असेल. आव्हान पेलण्यासाठी धोनीला गोलंदाजांची समर्थ साथ लागेल. गोलंदाजांच्या अपयशामुळेच आॅस्ट्रेलियाने ३०० वर धावांचा पाठलाग करीत दोन्ही सामने जिंकले. इतक्या धावांचा बचाव गोलंदाज करीत नसतील, तर काय उपयोग? आता धोनी फलंदाजांकडून ३३०-३४० धावांची अपेक्षा बाळगत आहे. रोहित शर्मा आणि कोहली फॉर्ममध्ये आहेत, पण अखेरच्या षटकांत धावा निघताना दिसत नाहीत. अजिंक्य रहाणे याने मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली, तरीही त्याला अतिरिक्त जबाबदारी उचलण्याची गरज असेल. शिखर धवनचा फॉर्म चिंतेचा विषय आहेच. गोलंदाजीत पाच जण खेळवायचे का, हादेखील धोनीसाठी चिंतेचा विषय असेल. तरीही निर्णायक असलेल्या या लढतीत संघात काही बदल होतील, असे दिसत नाही. दुसरीकडे आॅस्ट्रेलियाची स्थिती भक्कम असल्याने सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी मिळविण्याचे त्यांचे मनसुबे असतील.(वृत्तसंस्था)हेजलवूड वन-डे मालिकेबाहेरभारताविरुद्ध सुरू असलेल्या वन-डे मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. जॉन हेस्टिंग्ज त्याचे स्थान घेईल. हेजलवूडला उन्हाळ्यात सहा कसोटी सामने खेळायचे असल्याने त्याला आराम देण्यात येत आहे. तो फिट होऊन परातावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे कोच डेरेन लेहमन म्हणाले. मेलबोर्नच्या मैदानावर आॅस्ट्रेलिया संघाने ९ जानेवारी २००४ रोजी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताविरुद्ध ४८.३ षटकांत २८८ धावा केल्या होत्या. नंतर भारताने २८९ चे लक्ष्य समोर ठेवून ४९ षटकांत २७० धावा केल्या होत्या.या मैदानावर भारत व आॅस्ट्रेलिया यांच्या आतापर्यंत १३ सामने झाले आहेत. यामध्ये भारताने ५, तर आॅस्ट्रेलियाने ८ सामने जिंकले आहेत. सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्माने या मैदानावर १८ जानेवारी २०१५ रोजी १३९ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांच्या साहाय्याने १३८ धावांची आक्रमक खेळी केली होती. रोहितने या मालिकेत दोन्ही लढतींमध्ये शतके ठोकली आहे. या मैदानावर ईशांत शर्माने १० फेब्रुवारी २००८ रोजी ९.१ षटकात ३८ धावा देऊन ४ विकेट घेतल्या होत्या. भारत : महेंद्रसिंह धोनी कर्णधार, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, ईशांत शर्मा, उमेश यादव, बरिंदर शरण.आॅस्ट्रेलिया : स्टीवन स्मिथ कर्णधार, अ‍ॅरोन फिंच, शॉन मार्श, जॉर्ज बेली, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल मार्श, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), जेम्स फॉल्कनर, जॉन हेंस्टिग्स, स्कॉट बोलँड, जोएल पेरिस.- सामन्याची वेळ सकाळी ८.५० पासून