शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

पाकसाठी ‘करा अथवा मरा’

By admin | Published: June 07, 2017 12:33 AM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी आज, बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे.

बर्मिंघम : सलामी लढतीत भारताविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी आज, बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध १२४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता, तर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा ९६ धावांनी पराभव केला. आणखी एक पराभव पाक संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्यास पुरेसा ठरेल, पण जागतिक वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करणे सोपे नाही. भारताविरुद्ध सहज पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तानच्या फलंदाजांपुढे चांगली कामगिरी करण्याचे दडपण राहील. भारताच्या वेगवान गोलंदाजांना समर्थपणे तोंड देण्यात अपयशी ठरलेल्या पाकच्या फलंदाजांना त्या तुलनेत अधिक धारदार वेगवान मारा असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान पेलता येईल का, याबाबत उत्सुकता आहे. रबाडाच्या नेतृत्वाखाली या संघात मोर्नी मोर्कल व वेन पार्नेल या वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांवर माजी क्रिकेटपटूंनी टीका केली. आता पाकच्या फलंदाजांपुढे स्वत:ला सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. दुसरीकडे ख्रिस मॉरिसची आयपीएलमधील अष्टपैलू कामगिरी बघितल्यानंतर तो कुठल्याही संघाविरुद्ध वर्चस्व गाजवण्यास सज्ज असल्याची प्रचिती येते. (वृत्तसंस्था)(वृत्तसंस्था)फलंदाजीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाची भिस्त हाशिम अमला, कर्णधार एबी डिव्हिलियर्स आणि फॅफ ड्यूप्लेसिस यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. डिव्हिलियर्स मोठी खेळी करण्यात उत्सुक असेल.वेगवान गोलंदाजी पाक संघाची मुख्य शक्ती आहे, पण सध्या प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंची पाक संघात वानवा आहे. या व्यतिरिक्त पाक संघाला कामगिरीतही सातत्य राखता आलेले नाही. दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम अमला, फरहान बेहार्डियन, क्विंटन डिकाक, जेपी ड्युमिनी, फॅफ ड्यूप्लेसिस, इम्रान ताहिर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मोर्नी मोर्कल, ख्रिस मॉरिस, वेन पारनेल, एंडिले पी, ड्वेन प्रिटोरियस आणि कागिसो रबाडा. पाकिस्तान : सरफराज खान (कर्णधार), अहमद शहजाद, अझहर अली, बाबर आजम, फहीम अशरफ, फखार जमान, हारिस सोहेल, हसन अली, इमाद वसीम, जुनेद खान, मोहम्मद आमिर, मोहम्मद हफीज, शादाब खान आणि शोएब मलिक.