मुंबई : टी-२० स्पेशालिस्ट आणि चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा प्रमुख गोलंदाज लसिथ मलिंगा गुडघ्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या नवव्या सत्रातील पहिले ५ सामने खेळणार नसल्याची माहिती संघाचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने दिली. पाँटिंगने सांगितले, ‘‘गुडघ्याच्या दुखापतीमुळे मलिंगाच्या सहभागाविषयी अजूनही प्रश्नचिन्ह आहे. यामुळे पहिल्या ५ सामन्यांत तो जवळपास खेळणार नसल्याचे दिसत आहे.’’ त्याचप्रमाणे, ‘‘पहिले ५ सामने त्याच्याविना खेळल्यानंतर मलिंगाच्या तंदुरुस्तीनुसार त्याचा संघात समावेश केला जाईल,’’ असेही पाँटिंग म्हणाला.याच वेळी दुसऱ्या बाजूला लढवय्या युवराजसिंगही दुखापतीमुळे आयपीएलमध्ये पहिले २ आठवडे खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संघाचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, ‘‘उपचारांसाठी युवराज कमीत कमी दोन आठवडे स्पर्धेबाहेर राहील.’’ (वृत्तसंस्था)
मलिंगा, युवराज पहिल्या सत्रात बाहेर
By admin | Published: April 08, 2016 3:18 AM