लास व्हेगास : भारताच्या ग्रीको रोमन प्रकारातील मल्लांची कामगिरी विश्व कुस्ती चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या दिवशीही निराशाजनक राहिली. चारपैकी केवळ एक मल्ल रेपेचेसमध्ये पोहोचू शकला, पण त्यालादेखील पराभवाचे तोंड पाहावे लागले.रविंदरसिंग ५९ किलो गटात अझरबैझानचा रोवशान बेरामोवकडून ९-१ ने पराभूत झाला; पण बेरामोव अंतिम फेरीत दाखल होताच रविंदरला रेपेचेस खेळण्याची संधी मिळाली. त्यातही तो उत्तर कोरियाचा यून व्होन चोलकडून २-६ ने पराभूत झाला. मोहम्मद रफीक होली (७१ किलो), हरप्रीतसिंग (८०) व नवीन (१३०) हे पात्रता सामन्यातच गारद झाले. रफीकला अक्रम बोजेम्लाईनने ७-४ ने, अक्षत डीने हरप्रीतला २-०ने व नवीनला मेंग कियाँगने २-६ ने धूळ चारली. (वृत्तसंस्था)
मल्लांची खराब कामगिरी सुरूच
By admin | Published: September 10, 2015 12:55 AM