नवी दिल्ली : भारतीय बँकांना नऊ हजार कोटी रुपये कर्जाचा गुंगारा देत ब्रिटनमध्ये आश्रयास असलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याने काल टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या फाऊंडेशनद्वारा आयोजित ‘चॅरिटी डीनर’ला हजेरी लावली. कोहलीसह संपूर्ण भारतीय संघाने कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली खरी पण माल्यापासून ‘चार हात दूरच’ राहण्याचा निर्णय घेतला. वाद टाळण्यासाठी माल्या उपस्थित होण्याआधीच भारतीय खेळाडू कार्यक्रमातून निघून गेले. त्याआधी माल्या एजबेस्टन येथे रविवारी झालेल्या भारत-पाक सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. भारताने नऊ हजार कोटींच्या वसुलीसाठी ब्रिटन सरकारला विनंती करीत मल्ल्याला सोपविण्याची मागणी केली आहे. भारतीय संघाने माल्यापासून सुरक्षित अंतर राखले. (वृत्तसंस्था)कार्यक्रमात उपस्थित बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्ल्या उपस्थित होणार असल्याने विराट आणि सहकारी द्विधा मन:स्थितीत दिसले. विराट किंवा त्याच्या फाऊंडेशनने माल्याला आमंत्रित केले नव्हते. तथापि, चॅरिटी डीनरमध्ये कुणी टेबल बुक केला असेल तर ती व्यक्ती आपल्या पाहुण्यांना आमंत्रित करू शकते. कुणीतरी असेच केले.’
‘कोहली’च्या कार्यक्रमात मल्ल्या
By admin | Published: June 07, 2017 1:08 AM