केदार लेले ल्ल लंडन
सर्जियो अॅग्वेरोच्या हॅट्ट्रिकमुळे मँचेस्टर सिटीने 2क्13 चे चँपियन्स लीग विजेते आणि गुणतक्त्यात अव्वल असणा:या बायर्न म्युनिकला 3-2 अशा गोलफरकाने पराभूत केले.
ई गटातील गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर असलेल्या मँचेस्टर सिटीच्या संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा होता. शेवटच्या मिनिटाला सीएसके मॉस्को संघाने रोमा संघाविरुद्ध गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. या निकालामुळे मँचेस्टर सिटी संघाला आशेचा अंधुक किरण दिसला! युएफा चँपियन्स लीगच्या अंतिम 16 मध्ये वाटचाल करण्यासाठी त्यांच्यापुढे आता आव्हान होते ते म्हणजे 2क्13चे चँपियन्स लीग विजेते आणि गुणतक्त्यात अव्वल असणा:या बायर्न म्युनिकला पराभूत करण्याचे.
या स्पर्धेत आपले आव्हान टिकवण्यासाठी सिटीने सामन्याच्या सुरवातीस जोमाने प्रयत्न केले. 2क्व्या मिनिटाला बायर्न म्युनिकच्या मेधी बेनेशियाने सर्जियो अॅग्वेरोला धसमुसळेपणो रोखल्यामुळे त्याला लाल कार्ड दाखवण्यात आले आणि त्याला मैदान सोडावे लागले. मँचेस्टर सिटीला आयती पेनल्टी किक मिळाली आणि या संधीचं सर्जियो अॅग्वेरोनं सोनं केलं. 21व्या मिनिटाला सर्जियो अॅग्वेरोने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून मँचेस्टर सिटी संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. सामन्यात क्-1 अशा पिछाडीवर पडलेल्या आणि दहा खेळाडूंनिशी खेळणा:या बायर्न म्युनिकच्या संघाने बरोबरीसाठी नेटाने प्रयत्न केले. सुमारे वीस मिनिटे मँचेस्टर सिटीने आघाडी कायम राखली. पण पूर्वार्ध संपायला पाच मिनिटे असताना ङॉवी अलान्झोने (4क्व्या मिनिटाला) गोल करून बायर्न म्युनिकला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. तसेच पूर्वार्ध संपायला काहीच क्षण बाकी असताना बायर्न म्युनिकतर्फे लेवानडावस्की याने (45व्या मिनिटाला) गोल करून बायर्न म्युनिकला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली! बायर्न म्युनिकने घेतलेल्या या निसटत्या आघाडीमुळे मँचेस्टर सिटी संघाच्या अंतिम 16 मध्ये वाटचाल करण्याच्या आशा जवळ-जवळ संपुष्टात आणल्या. 1-2 असा पिछाडीवर असलेला सिटीचा संघ उत्तरार्धाच्या सुरवातीला मैदानात उतरला ते म्हणजे पुनरागमन करण्याचा चंग बांधूनच; पण यश मात्र त्यांना सतत हुलकावणी देत होते! अखेर सामना संपायला पाच मिनिटे असताना बायर्न म्युनिकच्या ङॉवी अलान्झोने केलेल्या चुकीचा फायदा उठवीत (85व्या मिनिटाला) सर्जियो अॅग्वेरोने गोल केला आणि सिटीला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.
तीन मिनिटांच्या वाढीव ‘इंज्युरी-टाइम’मध्ये पुन्हा एकदा सर्जियो अॅग्वेरोने बायर्न म्युनिकने केलेल्या चुकीचा फायदा उठविला. जेरोम बोयेटेंगच्या चुकीचा फायदा उठवीत (9क्+1 व्या मिनिटाला) सर्जियो अॅग्वेरोने गोल केला आणि आपली हॅटट्रिक पूर्ण करत सिटीला बायर्न म्युनिकवर रोमहर्षक विजय मिळवून दिला.
सामन्याची ठळक क्षणचित्रे
1) 2क्व्या मिनिटाला बायर्नच्या मेधी बेनेशिया यास लाल कार्ड, सिटीला पेनल्टी
2) पूर्वार्ध संपताना शेवटच्या पाच मिनिटांत सिटी विरुद्ध दोन गोल डागत बायर्न म्युनिकची 2-1ने आघाडी.
3) उत्तरार्धात शेवटच्या 6 मिनिटांत सर्जियो अॅग्वेरोचे दोन गोल.
4) सर्जियो अॅग्वेरोने हॅट्ट्रिक पूर्ण करत सिटीला बायर्न म्युनिकवर रोमहर्षक विजय मिळवून दिला!
5) ई गटात तीन संघांचे संयुक्त पाच गुण
6) पुढील सामन्यात बायर्नकडून सीएसके मॉस्को पराभूत झाल्यास अंतिम 16 मध्ये सिटीचे स्थान निश्चित