भारतीय हॉकी संघातील आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह सापडला आहे. स्ट्रायकर मनदीप सिंहची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून आतापर्यंत 6 जणांना कोरोना झाला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण ( साइ)नं ही माहिती दिली आहे.
World Test Championship : पाकिस्तानच्या बाबर आझमची सरशी; विराट कोहलीवर कुरघोडी
''मनदीप सिंह हा भारतीय पुरुष हॉकी संघाचा सदस्य आहे आणि बंगळुरू येथील राष्ट्रीय सराव शिबिरापूर्वी 20 खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अन्य पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसह त्याचाही डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत,''असे साइनं सांगितलं.
यापूर्वी कर्णधार मनप्रीत सिंह, सुरेंदर कुमार, जलस्करन सिंह, वरूण कुमार आणि कृष्णा पाठक यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली होती. 4 ऑगस्टपासून हॉकीच्या राष्ट्रीय शिबिराला सुरुवात झाली. प्रशिक्षक ग्रॅहम रेड यांनी सांगितले की,''मी सर्व खेळाडूंच्या सातत्यानं संपर्कात आहे आणि त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांची काळजी घेण्यासाठी साइनं सर्व सुविधा केल्या आहेत. त्यांच्या आवडीनुसार खाणंही तयार केलं जात आहे.''
बाबोss... 18 कॅरेट सोनं, 3600 हिरे; तयार होतोय 11 कोटींचा शाही 'मास्क'!
हसीन जहाँनं मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत, म्हणाली...
IPL 2020 होणार आत्मनिर्भर!; बाबा रामदेव यांची कंपनी 'पतंजली' उतरली टायटल स्पॉन्सर्सच्या शर्यतीत