मणिपूर भूकंप
By admin | Published: February 13, 2015 12:38 AM
मणिपूरला भूकंपाचे धक्केनवी दिल्ली : मणिपूरमध्ये गुरुवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.० नोंदवल्या गेली. भूकंपाचे केंद्र २४.२ डिग्री उत्तरेला आणि ९४.०० डिग्री पूर्वेला असून ...
मणिपूरला भूकंपाचे धक्केनवी दिल्ली : मणिपूरमध्ये गुरुवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रात्री ८ वाजून ३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.० नोंदवल्या गेली. भूकंपाचे केंद्र २४.२ डिग्री उत्तरेला आणि ९४.०० डिग्री पूर्वेला असून जमिनीपासून ९० किलोमीटर आत होते. या व्यतिरिक्त भूकंपाचा आणखी एक धक्का रात्री ८ वाजून ४ मिनिटांनी जाणवला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ होती. भूकंपाचे केंद्र उत्तरेला २४ डिग्री अक्षांश आणि पूर्वेला ९४ डिग्री होते. जमिनीपासून ५० किलोमीटर आत होते. (वृत्तसंस्था)