शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Tokyo Olympic : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूचे भारतात जंगी स्वागत अन् सरकारकडून मिळालं मोठं गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 5:33 PM

Tokyo Olympic Saikhom Mirabai Chanu  : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचे सोमवारी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले.

Tokyo Olympic Saikhom Mirabai Chanu  : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिचे सोमवारी नवी दिल्लीत जंगी स्वागत करण्यात आले. पोलिसांच्या सुरक्षेत मीराबाई विमानतळाबाहेर आली आणि तिच्या स्वागतासाठी मोठ मोठ्या हस्तींपासून ते क्रीडा प्रेमी उपस्थित होते. विमानतळातून बाहेर येत असताना कर्मचाऱ्यांनीही टाळ्यांच्या गजरात व जयघोष करत मीराबाईचे आभार मानले. मायदेशात परतताच मीराबाईला सरकारकडूनही मोठं गिफ्ट मिळालं. ( Olympic silver medallist Mirabai Chanu receives a warm welcome as the staff at the Delhi airport cheered for her upon her arrival from #TokyoOlympics) 

Tokyo Olympics: मीराबाई चानूला मिळू शकतं 'सुवर्ण'पदक; चीनच्या गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरची डोपिंग चाचणी!

महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू हिने स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन व जर्कमध्ये ११५ किलो असे मिळून २०२ किले वजन उचलले आणि रौप्य पदावर नाव कोरले. या गटाच चीनच्या हाओ झी हिने स्नॅचमध्ये ९४ आणि क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे २१० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तर इंडोनेशियाच्या एशाह हिने कांस्यपदक पटकावले. २००० मध्ये झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कर्नाम मल्लेश्वरीने भारोत्तोलनमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक पदक पटकावणारी मीराबाई चानू ही भारताची दुसरी भारोत्तोलक ठरली. 

भारतात येताच मीराबाई म्हणाली, हे आव्हानात्मक होते. 2016पासून आम्ही तयारीला सुरुवात केली आणि रिओ ऑलिम्पिकनंतर सरावाच्या पद्धतीत बदल केला. मी आणि माझे प्रशिक्षक यांनी मागील पाच वर्ष स्वतःला झोकून टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारी केली होती.''   ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व कौतुक केलं. मीराबाईला 1 कोटी रुपयांचं बक्षीस देणार असून तिच्यासाठी सरकारी नोकरीतही स्पेशल पोस्ट देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मायदेशात परतताच मणीपूर सरकारनं मीराबाईची अतिरिक्त पोलीस अधीक्षक ( क्रीडा) या पदावर नियुक्ती केली. ( Manipur Government has decided to appoint Olympic Silver Medallist Saikhom Mirabai Chanu as Additional Superintendent of Police (Sports) in the police department: Chief Minister's Secretariat, Imphal) 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Mirabai Chanuमीराबाई चानूWeightliftingवेटलिफ्टिंगManipur Lok Sabha Election 2019मणिपुर लोकसभा निवडणूक 2019