शहरं
Join us  
Trending Stories
1
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
2
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
3
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
4
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
5
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
6
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
7
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
8
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
9
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
10
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम
11
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
12
युवीने सांगितला जुना किस्सा! चाहत्यांनी फटकारले; दीपिकाची बदनामी केल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?
13
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
14
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
15
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
16
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
17
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
18
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
19
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
20
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."

मनप्रीतकडे भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व

By admin | Published: May 18, 2017 8:14 PM

विश्व लीग सेमीफायनल तसेच जर्मनीत आयोजित तीन देशांच्या आमंत्रित स्पर्धेसाठी हाफबॅक मनप्रीतसिंग याच्याकडे भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 18 : विश्व लीग सेमीफायनल तसेच जर्मनीत आयोजित तीन देशांच्या आमंत्रित स्पर्धेसाठी हाफबॅक मनप्रीतसिंग याच्याकडे भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. नियमित कर्णधार पी.आर. श्रीजेश हा गुडघ्याच्या जखमेमुळे बाहेर आहे. श्रीजेशला सुल्तान अजशनशाह चषक स्पर्धेदरम्यान जखम झाली होती. चिंग्लेनसनासिंग हा संघाचा उपकर्णधार असेल.तिरंगी मालिकेचे आयोजन जर्मनीच्या डसेलडोर्फ शहरात १ जूनपासून तसेच विश्व हॉकी लीग सेमीफायनल लंडनमध्ये १५ जूनपासून होणार आहे. १८ सदस्यांचा भारतीय संघ तिरंगी मालिकेत जर्मनी आणि बेल्जियमविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळेल. लंडन विश्व हॉकी लीगमध्ये भारताला ब गटात कॅनडा, नेदरलँड, पाकिस्तान आणि स्कॉटलंड यांच्यासोबत स्थान मिळाले. संघात प्रदीप मोर, कोथाजितसिंग, रुपिंदरपालसिंग, आणि हरमनप्रीतसिंग हे बचावफळी सांभाळतील. आकाश चिकटे आणि विकास दहिया हे गोलकिपर राहतील. मधल्या फळीत एस. के. उथप्पा, सतबीरसिंग, हरजीतसिंग, चिंग्लेनसनासिंग, अनुभवी मनप्रीतआणि सरदारसिंग हे खेळाडू असून आक्रमक फळीची जबाबदारी  रमनदीपसिंग, एस. व्ही. सुनील, आकाशदीपसिंग, तलविंदरसिंग आणि मनदीपसिंगयांच्यावर सोपविण्यात आली आहे. भारतीय हॉकी संघाचे मुख्य कोच रोलँट ओल्टमन्स म्हणाले,ह्यआम्ही सुल्तान अझलन शाह स्पर्धेनंतर काही बदल करू इच्छित होतो. युवकांना संधी देत आहोत. विश्व हॉकी लीगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचणे आमचे उद्दिष्टआहे.भारतीय हॉकी संघगोलकीपर :आकाश चिकटे, विकास दहिया.बचावफळी : प्रदीप मोरे, कोथाजीतसिंग, सुरेंदर कुमार, रुपिंदर पालसिंग,हरमनप्रीतसिंग, मधली फळी : चिंग्लेनसनासिंग, एस. के. उथप्पा, सतबीरसिंग,सरदारसिंग, मनप्रीतसिंग (कर्णधार), हरजीतसिंग. आक्रमक फळी: रमनदीपसिंग,एस. व्ही. सुनील,तलविंदरसिंग,मनदीपसिंग,आकाशदीपसिंग.