शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

मनू, सुमित उपांत्यपूर्व फेरीत; प्रणय पराभूत

By admin | Published: July 15, 2017 12:51 AM

मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी ही सध्याची विजेती जोडी कॅनडा ओपन ग्रॅण्डप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली

कॅलागरी : मनू अत्री आणि बी. सुमित रेड्डी ही सध्याची विजेती जोडी कॅनडा ओपन ग्रॅण्डप्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. पुरुष एकेरीत मात्र एच.एस. प्रणयला पराभवाचे तोंड पहावे लागले.मनू-सुमित या तिसऱ्या मानांकित जोडीने कोरियाचे चोई सोलग्यू-जी किम यांचा ४५ मिनिटांत २१-१७, १७-२१, २१-१३ ने पराभव केला. प्रणय-जेरी चोपडा ही दुसरी मानांकित जोडी मिश्र प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली. या जोडीने नेदरलॅन्डचा रॉबिन टेबलिंग-चेली सीनेन यांच्यावर २१-११, २१-१७ ने विजय साजरा केला. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये विजेत्या राहिलेल्या या जोडीला आता कोरियाच्या खेळाडूंविरुद्ध झुंज द्यावी लागेल. पुरुष एकेरीत प्रणयसह अन्य भारतीय खेळाडू पराभूत झाले. दुसरा मानांकित प्रणयने पहिला गेम जिंकल्यानंतरही कोरियाचा जियोन हिसोक याच्याकडून त्याला २१-१७, १४-२१, १३-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. करण राजन जपानचा कोकी वलानाबे याच्याकडून १८-२१,१४-२१ ने पराभूत झाला.राष्ट्रकुल चॅम्पियन पी. कश्यपला दुसऱ्या फेरीत वतानाबे याच्याकडून १०-२१, २१-१०, १५-२१ ने पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीत रुत्विका गाडे आणि राष्ट्रीय चॅम्पियन रितुपर्णा दास या पराभूत झाल्या. (वृत्तसंस्था)