शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
6
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
7
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
8
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
9
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
11
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
12
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
14
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
16
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
17
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
18
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
19
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
20
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

मनू भाकर पुन्हा पॅरिसला जाणार; गोलकीपर श्रीजेशसोबत महत्वाची जबाबदारी पार पाडणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 5:28 PM

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 5 पदकांवर आपले नाव कोरले आहे.

Manu Bhaker and PR Sreejesh India Flagbearer : खेळाचा 'महाकुंभ' समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. 26 जुलै रोजी सुरू झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 5 पदकांची कमाई केली आहे. आपापल्या स्पर्धा झाल्यानंतर अनेक खेळाडू मायदेशात परतले आहेत. पण, आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) पॅरिस ऑलिम्पिकच्या समारोप समारंभासाठी हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि नेमबाज मनू भाकर यांची भारतीय दलाचे ध्वज वाहक म्हणून निवड केली आहे.

IOA ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, 'पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेच्या समारोप समारंभात(11 ऑगस्ट) नेमबाज मनू भाकर आणि हॉकी संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश यांची संयुक्त ध्वजवाहक म्हणून निवड करताना भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आनंद होत आहे.'

दरम्यान, IOA अध्यक्ष पीटी उषा म्हणाल्या की, 'शेफ डी मिशन गगन नारंग आणि संपूर्ण भारतीय दलासाठी श्रीजेशेची निवड करणे खूप भावनिक होते. श्रीजेशने दोन दशकांहून अधिक काळ भारतीय हॉकीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मी भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राशी चर्चा केली, तेव्हा नीरजनेही श्रीजेशचे नाव सुचवले असते. यावरुन नीरजला श्रीजेश आणि भारतीय खेळातील त्याच्या योगदानाबद्दल असलेला प्रचंड आदर दिसून येतो.'

मनूला पुन्हा पॅरिसला जावे लागेलनेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. मनूने 10 मीटर एअर शूटिंगमध्ये कांस्य पदकावर नाव कोरले. यानंतर मनूनेही सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगच्या साथीने दुसऱ्यांदा कांस्य पदकाची कामगिरी केली. स्पर्धा झाल्यानंतर मनू भारतात परतली, पण आता तिला या निरोप समारोप समारंभासाठी पुन्हा पॅरिसला जावे लागेल. तर पीआर श्रीजेशने भारतीय पुरुष हॉकी संघासाठी गोलरक्षक म्हणून चमकदार कामगिरी केली. भारतीय हॉकी संघाने स्पेनचा 2-1 असा पराभव करुन कांस्यपदकावर नाव कोरले. श्रीजेशचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४IndiaभारतParisपॅरिस